Nashik News : सिन्नरमध्ये बिबट्याने हल्ला केला, पण मृत्यूचं कारण वेगळंच, 40 वर्षांच्या गोरखसोबत काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.पण या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गोरख जाधव (वय 40) असे या व्यक्तीचे नाव आहे.
Nashik News : लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी, नाशिक : गेल्या अनेक महिन्यापासून राज्यभरातील विविध ठिकाणी बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्याच्या या हल्ल्यात काही नागरीकांचा मृत्यू झाला तर काही जणांना गंभीर दुखापत होऊन ते थोडक्यात बचावल्याच्याही घटना घडल्या आहेत. या घटना ताज्या असतानाच तिकडे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे.पण या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नव्हे तर एका वेगळ्याच कारणाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. गोरख जाधव (वय 40) असे या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.आता गोरख जाधवचा नेमका मृत्यू कशामुळे झाला? हे जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार,सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात ही विचित्र आणि भयानक घटना घटना घडली आहे. गोरख जाधव हे आपल्या शेताला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी दिल्यानंतर ते विहीरीच्या शेजारी जेवत असताना अचानक बिबट्या आला आणि त्याने गोरख जाधव यांच्यावर हल्ला केला होता.
या हल्ल्यानंतर झटापटीत बिबट्या आणि गोरख जाधव थेट विहिरीत पडले होते.त्यामु्ळे विहिरीत पडून गोरख जाधवचा दुदैवी मृत्यू झाला होता. या घटनेत बिबट्याने गोरख जाधव यांच्यावर हल्ला केला. पण गोरख जाधव यांचा खरा मृत्यू हा विहिरीत बुडून झाला आहे. या घटनेत बिबट्यात विहिरीत सूखरूप होता आणि बाहेर पडण्याची धडपड करत होता. या घटनेने जाधव कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे, तर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement
या घटनेसोबत आजच पाला गोळा करणाऱ्या एका मुलावरही बिबट्याचा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.या घटनेनंतर शिवडे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती पोलीस आणि वनविभागाला देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.तर वनविभागाने विहिरीतल्या बिबट्याला पिंजऱ्यात बंद केलं आहे.आता या घटनेनंतर त्याला नैसर्गित अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 04, 2026 7:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik News : सिन्नरमध्ये बिबट्याने हल्ला केला, पण मृत्यूचं कारण वेगळंच, 40 वर्षांच्या गोरखसोबत काय घडलं?











