advertisement

Nashik News: हात-पाय बांधले,कंबरेला डंबेल्स लावले; निफाडच्या शादाबचा चांदवडमध्ये थरकाप उडवणारा खून

Last Updated:

शादाब तांबोळी असे या तरुणाचे नाव असून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

News18
News18
नाशिक : निफाड तालुक्यातील उगाव येथून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा चांदवड तालुक्यातील परसूल भागात नदीपात्रात मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. शादाब तांबोळी असे या तरुणाचे नाव असून त्याचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शदाब तांबोळी हा 18 फेब्रुवारी रोजी घरातले सामान आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईक, मित्रमंडळी तसेच संभाव्य ठिकाणी शोध घेऊनही शादाब सापडला नाही. अखेर निफाड पोलीस ठाण्यात त्याची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून तपास सुरू असतानाच आज चांदवड तालुक्यातील परसूल परिसरात नदीच्या पुलाखाली पाण्यात तरंगताना त्याचा मृतदेह आढळून आला.
advertisement

अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार

घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पाहणीदरम्यान शदाबच्या तोंडावर, हातपायांवर आणि कंबरेला वजनदार डंबेल्स बांधलेले आढळून आले. या अमानुष कृत्यामुळे हत्या  नियोजनपूर्वक आणि निर्दयतेने करण्यात आल्याचे स्पष्ट होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
advertisement

कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

ऐन रमजान महिन्यात घडलेल्या या घटनेमुळे शदाबच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे. आपल्या मुलाचा अशा क्रूर पद्धतीने खून करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. परिसरातील नागरिकांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
advertisement

गुन्हेगारी प्रवृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह

या घटनेने शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिस तपासातून लवकरात लवकर सत्य समोर यावे आणि शदाबला न्याय मिळावा, हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik News: हात-पाय बांधले,कंबरेला डंबेल्स लावले; निफाडच्या शादाबचा चांदवडमध्ये थरकाप उडवणारा खून
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement