Nashik News : पालकांची चिंता वाढवणारी बातमी! आठवड्यात 2 शाळकरी मुलांनी संपवलं जीवन; कारणही धक्कादायक
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nashik News : नाशिक शहरात आठवड्यात नववी आणि दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक, (लक्ष्मण घाटोळ, प्रतनिधी) : आठवड्यापूर्वी आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून इयत्ता 10 वीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका घटनेने पालकांची चिंता वाढवली आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने 10 मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपवलं. ह्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिक शहरातील गंगापूर रोड वरील झोड्यक्स बिल्डिंग सिरीन मेडोज येथे ही घटना घडली. आदित्य भांडारकर असं आत्महत्या करणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. आज सकाळी 7:30 वाजता ही घटना घडली. आत्महत्या करण्याचं कारण अस्पष्ट आहे. मात्र, या घटनेने पालकांची चिंता वाढवली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला आहे.
advertisement
आठवड्यापूर्वी दहावीच्या मुलीची आत्महत्या
सिडकोतील स्वामी विवेकानंद नगरात सुनील शिलावट हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. मंगळवारी शिलावट कामासाठी घराबाहेर होते. तर त्यांची पत्नी नोकरीनिमित्त कामाच्या ठिकाणी गेल्या होत्या. त्यांची मुलगी भाग्यश्री (वय 16) ही इयत्ता १० वीचा पेपर देऊन घरी आली. त्यानंतर काही वेळाने तिची बहिण घरी आली. त्यावेळी भाग्यश्री स्वयंपाक खोलीतील पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. आत्महत्येपूर्वी भाग्यक्षीने एक चिठ्ठी लिहिली होती. त्यात आई-वडील यांच्या सततच्या भांडणाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं लिहिलं आहे.
advertisement
पालकांनी मुलांशी संवाद ठेवणे आवश्यक
view commentsसध्याच्या धकाधकीच्या जीवनात नात्यांमध्ये एकमेकांना वेळ देणे दुरापास्त होत चाललं आहे. त्यातही मोबाईलचा वाढता वापराने घरात एकत्र असूनही प्रत्येकजण मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेला असतो. परिणामी नात्यांमधील दुरावा वाढत चालला आहे. अशात अल्पवयीन मुलांची अनेकदा घुसमट होताना पाहायला मिळते. याचा पालकांनी गांभीर्याने विचार करायला हवा. आपल्या मुलांसोबत सुसंवाद ठेवणे आवश्यक आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Mar 20, 2024 5:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik News : पालकांची चिंता वाढवणारी बातमी! आठवड्यात 2 शाळकरी मुलांनी संपवलं जीवन; कारणही धक्कादायक









