Anant Chaturdashi 2025: बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिक महानगरपालिका सज्ज, या तलावात करा विसर्जन
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Mohan Najan
Last Updated:
भक्तांची आणि बाप्पाची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरता गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नाशिक महानगरपालिका सज्ज झाली आहे.
नाशिक: सर्वांच्या लाडक्या बाप्पाला येत्या शनिवारी अनंत चतुर्दशीला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे. भक्तांची आणि बाप्पाची कुठलीही गैरसोय होऊ नये याकरता गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नाशिक महानगरपालिका सज्ज झाली आहे. पर्यावरणाची काळजी घेता पंचवटी परिसरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात येऊन 300 मनपा कर्मचारी हे तैनात करण्यात येणार आहेत.
या ठिकाणी असणार 8 कृत्रिम तलाव
पंचवटीत म्हसरूळ सीतासरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण तसेच टाळकुटेशवर असे 8 ठिकाणी नैसर्गिक तलाव आहे. तर दिंडोरी रोडवर राजमाता मंगल कार्यालय, आरटीओ कॉर्नर गोरक्षनगर, कोणार्कनगर स्व. प्रमोद महाजन उद्यान सरस्वती नगर, कमलनगर, मखमलाबाद गाव, गोदापार्क जॉगिंग ट्रॅक या 10 ठिकाणी बाप्पाची विसर्जन व्यवस्था केली आहे.
advertisement
36 निर्माल्य वाहने ही दाखल
श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी निर्माल्य जमा करण्यासाठी कृत्रिम तलाव आणि नैसर्गिक तलाव असलेल्या अशा ठिकाणी एकूण 36 निर्माल्य संकलन वाहन ठेवले जाणार आहेत. गणेश विसर्जनाच्या दिवशी मनपा घनकचरा विभाग, बांधकाम विभाग आणि इतर विभागाचे कर्मचारी विसर्जन ठिकाणी तैनात केले जाणार आहेत. त्याच पद्धतीने तपोवन, नांदूर मानूर याठिकाणी नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव हे ठेवण्यात येणार असल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेने नागरिकांना दिली आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी पर्यावरण दूषित न होण्यासाठी महानगरपालिकेला मदत करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Sep 04, 2025 9:35 PM IST
मराठी बातम्या/नाशिक/
Anant Chaturdashi 2025: बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिक महानगरपालिका सज्ज, या तलावात करा विसर्जन









