Nashik Crime : एकतर्फी प्रेम! ‘तू माझ्याशी लग्न कर…’, तरुणाच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षीय मुलीने संपवल आयुष्य
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Nashik Crime : नाशिक येथे एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली आहे.
नाशिक, (लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी) : गेल्या महिन्याभरात महिलांवर घडलेल्या अत्याचारांच्या घटना पाहता लोकांकडून तीव्र संपात व्यक्त केला जात आहे. या सर्व गुन्ह्यांमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आळा आहे. दोषींवर कठोर कारवाई करू असं सरकार सांगत असले तरी या घटना थांबण्याचं नाव घेतना दिसत नाही. याचं कारण म्हणजे नुकतीच नाशिकमध्ये घडलेली घटना. नाशिकच्या देवळाली गावात 15 वर्षीय विद्यार्थिनीने आपलं जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे.
तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या
नाशिकच्या देवळाली गावात 15 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं आहे. विद्यार्थीनी शाळेत जाताना येताना तरुणाकडून सातत्याने छेडछाड केली जात होती. तब्बल दीड ते दोन वर्षे हा छेडछाडीचा प्रकार सुरू होता. लग्न न केल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी तरुणाने पीडित मुलीला दिली होती. तरुणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने अखेर आपलं जीवन संपवलं. विषारी औषध सेवन करून मुलीने आत्महत्या केली. विद्यार्थिनीच्या आत्महत्येप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात 10 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीला घेऊन जाताना संबंधित व्यक्तीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडीओच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
August 27, 2024 8:12 PM IST
मराठी बातम्या/नाशिक/
Nashik Crime : एकतर्फी प्रेम! ‘तू माझ्याशी लग्न कर…’, तरुणाच्या त्रासाला कंटाळून 15 वर्षीय मुलीने संपवल आयुष्य