'3 वर्षांपूर्वी मरायचं होतं, पण GF मुळे...', नाशकात इंजिनिअरींगच्या टॉपर तरुणाने संपवलं जीवन, चिठ्ठीत खंत व्यक्त

Last Updated:

Nashik Crime News: नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन जीवन संपवलं आहे.

News18
News18
Nashik Crime News: नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आपण तीन वर्षांपूर्वी आत्महत्या करणार होतो. पण गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्षे जगायला मिळाली, अशा आशयची इन्स्टाग्राम पोस्ट लिहून या तरुणाने जीवन संपवलं आहे. विशेष म्हणजे हा तरुण शिक्षणात अतिहुशार होता. त्याला ९५ टक्के मार्क्स मिळाले होते. अशा हुशार विद्यार्थ्याने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थ्याने शनिवार ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गंगापूर रोड परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेतली. या प्रकारानंतर त्याला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र मध्यरात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गंगापूर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तरुणाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. तो आपल्या कुटुंबासोबत नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात राहत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनी नोकरी करतात. काही दिवसांपूर्वीच त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्ता यादीनुसार प्रवेश घेतला होता. त्याला ९५ पेक्षा अधिक टक्के होते. अशा गुणवंत विद्यार्थ्याने अशाप्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याने कॉलेज प्रशासनात खळबळ उडाली आहे.
advertisement

काय होती शेवटची इन्स्टा पोस्ट?

‘हाय, गाइज तुम्ही मला शेवटचं ऐकत आहात. आयुष्यातील माझा इंटरेस्ट संपला आहे. माझ्या आयुष्यात ध्येय किंवा स्वप्नं शिल्लक राहिली नाहीत. माझ्यामुळे अनेकांना त्रास झालाय. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो. पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगायला मिळाली. तुम्हा सर्वांना माहिती आहे, मी शाळेपासूनच त्रासात आणि निराशेत आहे. सो, मी आता तेच करणार आहे. जे माझ्या आयुष्यात होते, त्या सर्वांना धन्यवाद. माझे कुटुंब, मित्र आणि हितचिंतक सर्वांना ‘लव्ह यू’. सो, साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ, गूड बाय. सर्वांचे आणि पालकांचे प्रयत्न मी वाया घालवल्याबद्दल व्हेरी व्हेरी सॉरी. तुम्ही काही चुकीचं केलं नाही , मी त्यासाठी पात्र नव्हतो...’ या आशयाची पोस्ट त्याने लिहिली होती.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
'3 वर्षांपूर्वी मरायचं होतं, पण GF मुळे...', नाशकात इंजिनिअरींगच्या टॉपर तरुणाने संपवलं जीवन, चिठ्ठीत खंत व्यक्त
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement