सप्तशृंगी गडावर दर्शनाला जाताय? 2 महिने वाहतुकीत बदल, आता ‘या’ वेळेतच प्रवास करता येणार
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Saptashrungi Traffic: प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एका बाजूची शेवटची गाडी पोहचेपर्यंत विरुद्ध दिशेची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येईल.
नाशिक: सप्तशृंगी गडाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नांदुरी ते सप्तशृंग गड या घाट मार्गावर रस्त्याच्या कामामुळे 12 जानेवारी ते 15 मार्च 2026 या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी एकेरी वाहतुकीचे नियम लागू करण्यात आले आहेत.
नांदुरी ते सप्तशृंग गड या 10 किलोमीटरच्या घाट मार्गावर सध्या काँक्रिटीकरण आणि संरक्षक भिंतीचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग डोंगराळ, अरुंद आणि तीव्र वळणांचा असल्याने कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू ठेवल्यास अपघाताचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आगामी चैत्रोत्सवापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने सहायक जिल्हाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांनी हे आदेश निर्गमित केले आहेत.
advertisement
असे असेल वाहतुकीचे 'नवे वेळापत्रक' (एकेरी वाहतूक)
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, एका बाजूची शेवटची गाडी पोहोचेपर्यंत विरुद्ध दिशेची वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात येईल. प्रवासाचे नियोजन करण्यासाठी वेळापत्रक नीट समजून घेणं गरजेचं आहे. 12 जानेवारी ते 15 मार्च 2026 या कालावधीत वाहतुकीचे हे वेळापत्रक लागू असणार आहे.
advertisement
नांदुरी ते सप्तशृंगी गड सकाळी सहा ते साडेसहा, आठ ते साडेआठ, दुपारी बारा ते साडेबारा, दोन ते अडीच, तिसऱ्या सत्रात चार ते साडेचार आणि सहा ते साडेसहा, रात्री आठ ते साडेआठ आणि दहा ते साडेदहा, मध्यरात्री बारा ते साडेबारा, दोन ते अडीच आणि चार ते साडेचार या कालावधीत वाहने सोडली जातील.
advertisement
सप्तशृंग गड ते नांदुरी या मार्गावर सकाळी सात ते साडेसात, नऊ ते साडेनऊ, अकरा ते साडेअकरा, दुपारी एक ते दीड, तीन ते साडेतीन, पाच ते साडेपाच, सायंकाळी सात ते साडेसात, रात्री नऊ ते साडेनऊ, अकरा ते साडेअकरा, मध्यरात्री एक ते दीड, पहाटे तीन ते साडेतीन आणि पाच ते साडेपाच वाजता ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.
advertisement
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहायक अभियंता रोहिणी वसावे यांनी स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्ते कामात अडथळा न येण्यासाठी हे बदल अनिवार्य आहेत. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि या वेळापत्रकानुसारच आपला प्रवास निश्चित करावा.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 1:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
सप्तशृंगी गडावर दर्शनाला जाताय? 2 महिने वाहतुकीत बदल, आता ‘या’ वेळेतच प्रवास करता येणार









