स्मार्टफोनमध्ये स्पेस कमी पडलाय का? अॅप्स डिलिट न करता असं रिकामं करा स्टोरेज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
फोनमध्ये कितीही स्टोरेज असेल तरीही एका काळानंतर ती कमी पडते. तुमच्याही फोनचं स्टोरेज फूल झालं तर तुम्ही अॅप्स डिलीट न करता स्पेस रिकामं करु शकता.
मुंबई : लोक आपल्या गरजेपेक्षा जास्त स्टोरेज असणारा फोन घेताता. मात्र एका काळानंतर ते स्टोरेजही कमी पडू लागतं. एकदा स्टोरेज फूल झालं तर सर्वात आधी वापरात नसलेले अॅप्स अनइंस्टॉल करण्याचा विचार मनात येतो. ही पद्धत कामही करते. मात्र अनेकदा यामुळे फेव्हरेट गेम किंवा अॅप डिलीट करावं लागतं. आता यावरही एक उपाय आला आहे. तुम्ही अॅप्स डिलीट न करता फोन स्पेस फ्री करु शकता.
ही पद्धत अँड्रॉइड स्मार्टफोनवर काम करेल
तुमच्याकडे अँड्रॉइड स्मार्टफोन असेल, तर तुम्ही अॅप्स न हटवता जागा मोकळी करू शकता. खरं तर, अँड्रॉइड 15 आणि नंतरच्या व्हर्जनवर अॅप्स आर्काइव्ह करण्याचा ऑप्शन देतात, ज्यामुळे ते हटवण्याची गरज दूर होते आणि तुमचा डेटा आणि प्रोग्रेसही सेव्ह होते.
अॅप आर्काइव्ह करण्याचा काय फायदा आहे?
advertisement
तुम्ही अॅप आर्काइव्ह करता तेव्हा त्याचा कोड, रिसोर्सेस आणि टेम्परेरी फाइल्स काढून टाकल्या जातात. फक्त तुमची लॉगिन माहिती, सेटिंग्ज आणि अॅप डेटा शिल्लक राहतो. आर्काइव्ह केल्याने अॅप डिलीट होत नाही; ते त्याच्या जागी लाइट आर्काइव्ह व्हर्जन आणते. यामुळे अॅपची स्पेस कमी होते आणि फोन स्टोरेज फ्री होते. जेव्हा तुम्ही अॅप रिस्टोर करता तेव्हा ते प्ले स्टोअरवरून लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड करते. ज्यामुळे तुम्हाला तीच सेटिंग्ज आणि प्रोग्रेस मिळते. तुम्ही अॅप पुन्हा वापरता तेव्हा तुम्हाला ते अर्काइव्ह केल्याचे कळणारही नाही. अर्काइव्ह केल्यानंतर, अॅप 50-60 टक्के कमी स्पेस घेते.
advertisement
अर्काइव्ह करणे आणि रिस्टोर करणे सोपे
कोणतेही अॅप अर्काइव्ह करणे किंवा रिस्टोर करणे सोपे आहे. तुमच्या फोनच्या सेटिंग्ज > अॅप्स वर जा. येथे, तुम्ही तुम्हाला हवे असलेले कोणतेही अॅप अर्काइव्ह करू शकता. अर्काइव्ह केल्यानंतर, अॅपचा आयकॉन तुमच्या फोनवर दिसेल, परंतु तो मंद होईल आणि क्लाउड आयकॉन दिसेल. ते अर्काइव्ह करण्यासाठी, अॅपच्या आयकॉनवर टॅप करा आणि अर्काइव्ह करा पर्याय निवडा. हे अॅप रिस्टोर होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 13, 2026 1:59 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
स्मार्टफोनमध्ये स्पेस कमी पडलाय का? अॅप्स डिलिट न करता असं रिकामं करा स्टोरेज











