नाशिककर महत्त्वाची बातमी, वर्दळीचा रस्ता 3 महिने बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणते?
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Nashik Traffic: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी असून शहरातील वर्दळीचा रस्ता 3 महिने वाहतुकीसाठी बदं राहणार आहे.
नाशिक: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेल्या जुना गंगापूर नाका (डोंगरे वसतिगृह मैदान) ते थेट शरणपूर पोलिस चौकीपर्यंतच्या रस्त्याचे नशीब उजळणार आहे. महापालिकेतर्फे या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता पुढील तीन महिने वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 19 एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
दोन टप्प्यांत होणार काम
वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून महापालिकेने या कामाचे दोन टप्पे केले आहेत. पहिल्या टप्प्यात शरणपूर पोलिस चौकी ते कॅनडा कॉर्नर या दरम्यान काम सुरू होईल. या काळात विरुद्ध बाजूने एकेरी वाहतूक सुरू राहील. पहिल्या बाजूचे काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या बाजूचे काम हाती घेतले जाईल.
advertisement
एकेरी वाहतुकीलाच मुभा
कुलकर्णी उद्यान ते कॅनडा कॉर्नर आणि टिळकवाडी रस्ता सध्या कामांमुळे बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी या मार्गावरून केवळ हलक्या वाहनांना (दुचाकी, कार) एकेरी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे. मात्र, जड वाहनांना या मार्गावर पूर्णपणे बंदी असेल.
असा असेल पर्यायी मार्ग
शरणपूर पोलिस चौकीकडून जुना गंगापूर नाक्याकडे जाणाऱ्या वाहनांना आता लांबचा वळसा घ्यावा लागणार आहे. ही वाहने त्र्यंबक रोडने एबीबी सिग्नल - महात्मा नगर - जेहान सर्कल ते गंगापूर रोड या मार्गाने मार्गस्थ होतील.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 10:47 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिककर महत्त्वाची बातमी, वर्दळीचा रस्ता 3 महिने बंद राहणार, पर्यायी मार्ग कोणते?








