समर्थ रामदासांनी नाशिक जिल्ह्यात उभारलेले गोमय हनुमान मंदिर, काय आहे या मंदिराचा इतिहास, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
समर्थ रामदास स्वामी यांचे आधीचे नाव नारायण ठोसर होते. जालना जिल्ह्यातील जांब या गावातून वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या लग्नाच्या मंडपातून ते पळाले आणि गोदेच्या काठाने नाशिक जवळील टाकळी गावाजवळ पोहोचले.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक : महाराष्ट्रात हजारो मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. एक आख्यायिका आहे. प्रत्येक मंदिराचे एक विशेष असे महत्त्व आहे. आज नाशिकमधील अशाच एका मंदिराची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्या मंदिराची स्थापना समर्थ रामदास स्वामी यांनी केली होती.
समर्थ रामदास स्वामी यांचे आधीचे नाव नारायण ठोसर होते. जालना जिल्ह्यातील जांब या गावातून वयाच्या बाराव्या वर्षी त्यांच्या लग्नाच्या मंडपातून ते पळाले आणि गोदेच्या काठाने नाशिक जवळील टाकळी गावाजवळ पोहोचले. आपल्या आयुष्यातील सर्वात जास्त कालावधी तब्ब्ल 12 वर्ष त्यांनी टाकली या गावात घालवला. नारायण ठोसर हे समर्थ रामदास स्वामी याठिकाणी असलेल्या मठात झाले. याचबाबत घेतलेला हा आढावा.
advertisement
दररोज सकाळी गोदावरी आणि नंदिनी आधीच्या संगमातील पाण्यात उभे राहून त्यांनी रामनामाचा जप केला. त्या काळातील शिष्यांपैकी उद्धवस्वामी हे सर्वात लहान वयाचे बालक देखील त्यांचे शिष्य झाले. समर्थांनी बारा वर्षे रामनामाचा जप केला. पण त्यानंतर जेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितले की, मी आता देशभ्रमंती करायला जाणार, त्यावेळी सर्व शिष्यांना दु;ख झाले. त्यात उद्धवस्वामी यांनी तर समर्थांच्या पायाला मिठी घालून ‘मला सोडून जाऊ नका, तुम्हीच माझे माता-पिता आणि पालक आहात, मी कुणाकडे बघू’, असे म्हटले.
advertisement
त्यावर समर्थांनी या स्थानावर आपल्या हाताने गोमय अर्थात गायीचे शेण आणि माती यांच्या मिश्रणातून हनुमानाची मूर्ती स्थापन केली. ‘ही मूर्तीच आता तुझा प्रतिपाळ करेल, तू या मूर्तीचीच उपासना कर’, असे सांगून ते तीर्थाटनाला गेले. ते स्थान आताचे नाशिकमधील प्रख्यात टाकळीचे हनुमान मंदिर आणि समर्थ रामदास स्वामींचा पहिला मठ म्हणून प्रसिद्ध आहे.
advertisement
बांदोडकर कॉलेजचे विद्यार्थी देतायेत सायबर सेक्युरिटी अवेअरनेसचे धडे, ठाण्यातील कौतुकास्पद उपक्रम, VIDEO
समर्थांनी स्थापन केलेल्या 11 मारुतींमध्ये या मारुतीची गणना होत नाही. मात्र, समर्थांनी स्थापन केलेली हनुमानाची पहिली मूर्ती म्हणून भाविकांची तिथे नेहमीच गर्दी असते. टाकळी हे गाव आता नाशिक महानगराचाच भाग आहे. या मारुतीची समर्थांच्या सामर्थ्याने तयार झालेला गोमय मारुती ज्या ठिकाणी भाविक येतात आणि मारुतीला साकडे घालतात. मारुती त्यांची मूर्ती नक्कीच मनोकामना पूर्ण करतो. याच ठिकाणी समर्थ रामदासांनी 13 कोटी राम नामाचा जप केल्यामुळे आणि त्या नंतर गायत्रीचे 12 वर्ष पुरश्चरण केल्याने या मारुतीमध्ये समर्थांची संपूर्ण शक्ती असल्याचे सांगितले जाते.
advertisement
सूचना - वर दिलेली माहिती ही आचार्य, पंडित यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती आख्यायिकेवर आधारित आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
August 24, 2024 11:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
समर्थ रामदासांनी नाशिक जिल्ह्यात उभारलेले गोमय हनुमान मंदिर, काय आहे या मंदिराचा इतिहास, VIDEO