3 वर्षांपूर्वी सुरुवात, आज नाशिकमध्ये स्वत:ची 9 दुकाने, प्रत्येक दुकानातून 5 लाखांची कमाई

Last Updated:

nashik business success story - निलेश यांनी बीई मॅकेनिकल इंजिनीअरींगचे शिक्षण घेतले आहे. उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरीला नाकारत व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. छोटा का होईना पण आपला स्वतःचा व्यवसाय असावा, याच विचारातून त्यांनी 3 वर्षांपूर्वी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला.

+
निलेश

निलेश कलेक्शन नाशिक

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक - एखाद्या व्यक्तीने घेतलेल्या निर्णयावर सातत्याने आणि मेहनतीने काम केले तर व्यक्ती नक्कीच यशस्वी होऊ शकतो हे नाशिकच्या निलेश भडांगे यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. त्यांनी निलेश क्लॉथ स्टोअर या नावाने 3 वर्षांपूर्वी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांची तब्बल 9 दुकाने आहेत. नेमकं त्यांनी ही प्रगती कशी केली, याचबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
निलेश यांनी बीई मॅकेनिकल इंजिनीअरींगचे शिक्षण घेतले आहे. उच्चशिक्षित असूनही त्यांनी नोकरीला नाकारत व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. छोटा का होईना पण आपला स्वतःचा व्यवसाय असावा, याच विचारातून त्यांनी 3 वर्षांपूर्वी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला.
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, सुरुवातीला अगदी 6 हजारांपासून एका छोट्याशा पत्र्याच्या दुकानातून त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांची तब्बल 9 दुकाने आहेत. तुम्ही कुठल्याही क्षेत्रातून पदवीधर असा अथवा अशिक्षित असा मनात जिद्द असली तर आपण काही करू शकतो आणि तेच मी केले, असे ते सांगतात.
advertisement
आपले चांगले शिक्षण झाले आहे. परंतु नोकरीत जी मज्जा नाही, ती व्यवसायात आहे आणि ते मी कुटुंबांनाही सिद्ध करुन दाखवले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी अनेक युवकांच्या ओळखीत आलो आणि तिथून माझ्या व्यवसायाची खरी सुरवात झाली. सुरुवातीला एका छोट्याशा पत्र्याच्या दुकानात स्टार्टअप चालू केल्यानंतर अल्पावधीतच मला प्रतिसाद मिळाला. अनेक अडचणीही आल्या. पण मी माझी जिद्द सोडली नाही. नेहमी सामोरे जात राहिलो.
advertisement
काही महिन्यानंतर कोरोनाचे संकट आले. लॉकडाऊन झाले. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जसजशी दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली तेव्हा पुन्हा व्यवसाय सुरू झाला. मित्रांमुळे आणि आपल्या सोशल मीडियामुळे ते नाशिकच्या अनेक तरुणाईपर्यंत पोहोचले. तिथून त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला, असे त्यांनी सांगितले.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यांनी पुन्हा दुकान घेऊन दुकानात कपड्यांचा व्य्सवसाय सुरू केला. परंतु सर्व चांगले चालत असताना काही ना काही अडचण आल्याशिवाय राहत नसते. असेच निलेश यांच्यासोबतही झाले. ज्याठिकाणी त्यांनी पुन्हा दुकान सुरू केले ते दुकान काही कारणास्तव त्यांना खाली करावे लागले. तरी देखील ते आपल्या जिद्दीवर ठाम राहिले.
advertisement
काहीच दिवसात त्यांनी पंचवटीजवळील मधुबन कॉलनी या ठिकाणी पुन्हा नवीन जोशाने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. नाशिकमध्ये 350 ते 400 रुपये अशा सर्वात कमी भावात त्यांच्याकडे शर्ट्स मिळत असल्यान अनेक तरुण हे या ठिकाणी गर्दी करतात. त्याचबरोबर त्यांच्या नेहमी सोशल मीडियावरच्या ऑफर्सने ते आज संपूर्ण महाराष्ट्रात निलेश कलेक्शन या नावाने ओळखले जात आहेत.
advertisement
निलेश हे आज 9 दुकानांचे मालक असून त्यांनी 40 मुलांना आणि महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. तसेच प्रत्येक दुकानातून महिन्याला 4 ते 5 लाख रुपयांची कमाई होत असल्याचेही त्यांनी सांगितले. निलेश यांचे हे शॉप नाशिक येथील पंचवटी भागात असलेल्या मधुबन कॉलनीमध्ये खरेदी कारण्यासाठी उपलब्ध आहे. अगदी कमी किमतीत या ठिकाणी उत्तम अशा क्वालिटीचे कपडे तुम्ही येथे खरेदी करू शकतात. निलेश यांचा हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
3 वर्षांपूर्वी सुरुवात, आज नाशिकमध्ये स्वत:ची 9 दुकाने, प्रत्येक दुकानातून 5 लाखांची कमाई
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement