advertisement

Nashik Crime: नाशिकमध्ये क्षुल्लक कारणावरून आपआपसात वाद, रिक्षा चालक गंभीर जखमी

Last Updated:

नाशिकमधील सिडको परिसरामध्ये हत्येचा धरार घडला आहे. दोन अनोळखी व्यक्तींसोबत एका रिक्षा चालकाचा वाद झाला.

News18
News18
नाशिक: नाशिक शहरातील सिडको परिसरामध्ये हत्येचा धरार घडला आहे. दोन अनोळखी व्यक्तींसोबत एका रिक्षा चालकाचा वाद झाला. त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात त्या दोन्हीही व्यक्तींनी रिक्षा चालकावर धारदार शस्राने हल्ला केला आहे. त्या दोन्हीही व्यक्तींनी रिक्षा चालकाला गंभीर जखमी केले असून त्याच्या रिक्षाचेही नुकसान केले आहे. काही क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात आपआपसात वाद झाला होता. अंबड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सध्या सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
नाशिक शहरातील सिडको परिसरामध्ये, गाडी मागे घेण्याच्या वादातून दोन अनोळखी व्यक्तींनी रिक्षा चालकावर धारदार शस्राने हल्ला केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेमध्ये गंभीर जखमी झालेला 28 वर्षीय विशाल भदर्गे अंबड परिसरातील गौतम नगरमध्ये राहतो. रविवारी 15 मार्चला रात्रीच्या वेळी अंबड परिसरातील कारगिल चौकातून विशाल त्याची रिक्षा घेऊन जात होता. त्यावेळी वाहतुक कोंडी झाल्यामुळे त्याने त्याची रिक्षा पाठी घेतली. त्याने अचानक रिक्षा पाठी घेतल्यामुळे त्याचा दोन अनोळखी लोकांसोबत वाद झाला.
advertisement
रिक्षा चालक गंभीर जखमी
रिक्षा पाठी घेतल्यामुळे रिक्षा चालकाचा त्या दोन अनोळखी लोकांसोबत वाद झाला. वाहतुक कोंडी सुटल्यानंतर वाद तिथेच संपला सुद्धा, पण त्या दोन्हीही अनोळखी व्यक्तींनी रिक्षा ड्रायव्हरचा राग मनात धरून त्याचा पाठलाग केला. रिक्षाच्या मागे जात त्याला रस्त्यात पुढे थांबवलं. त्याला थांबवून रिक्षातून बळजबरीने खाली ओढून त्याच्यावर भररस्त्यात हल्ला केला. रिक्षा चालकाला खाली खेचून त्या अनोळखी लोकांनी त्याच्या डोक्यात आणि उजव्या हातावर लोखंडी रॉडने मारलं. तर दुसऱ्याने, कमरेत ठेवलेले धारदार शस्र काढून त्याच्या डाव्या खांद्यावर, बगलेजवळ आणि कमरेवर हल्ला केला. सोबतच त्याच्या रिक्षाच्या काचा सुद्धा त्यांनी फोडल्या.
advertisement
घटनेनंतर तात्काळ रिक्षा चालक विशाल भदर्गेला एका जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. रिक्षाचालकावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून पोलि‍सांकडून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. या घटनेचा अंबड पोलीस ठाण्यामध्ये दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप पोलिसांकडून आरोपींचा शोध लागलेला नसून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांसमोर गुन्हेगारांना ताब्यात घेऊन चांगलीच अद्दल घडवणे, हा एक मोठा पर्याय नजरेसमोर आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Crime: नाशिकमध्ये क्षुल्लक कारणावरून आपआपसात वाद, रिक्षा चालक गंभीर जखमी
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement