advertisement

गंगा नदीपात्रात रंगली इफ्तार पार्टी, चिकण बिर्याणी खाऊन हाडं फेकली; हिंदूत्ववादी संघटना आक्रमक

Last Updated:

इफ्तार पार्टीसाठी आलेल्या सर्वांनी बिर्याणी खाल्ली आणि नंतर त्याची हाडं पवित्र गंगा नंदीच्या पात्रात फेकल्याचा आरोप करत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. 

News18
News18
नवी दिल्ली :  काशी ज्याला वाराणसी असेही म्हणतात, गंगानदीच्या किनारी वसलेले प्राचीन शहर आहे. हिंदू धर्मासाठी हे अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. दरम्यान सध्या काशीमध्ये एका व्हिडीओवरून प्रचंड गोंधळ उडाला आहे. गंगा नदी पात्रआत एक बोट बुक करत इफ्तार पार्टी करण्यात आली या पार्टीत चक्क बिर्याणी होती. इफ्तार पार्टी झाल्यानंतर चिकन बिर्याणीची हाडं आणि कचरा गंगा नदीच्या पात्रात फेकण्यात आल्याच्या आरोपावरुन १४ मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपा युवा मोर्चाच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीची दखल घेत प्रार्थनास्थळाचा अपमान आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली मंगळवारी चौदा मुस्लिम तरुणांना पोलिसांनी अटक केली.
इफ्तार पार्टीच्या व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजप आणि हिंदूत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष रजत जयस्वाल यांनी कोतवाली स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर आठ तासातच पोलिसांनी 14 जणांना अटक केली आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

काशीमध्ये गंगा नदीपात्रात इफ्तार पार्टी साजरी करण्यासाठी एका युवकाने मोठी नाव बुक केली होती. या इफ्तार पार्टीला त्यांना रोजा ठेवणाऱ्या त्याच्या मित्रांना बोलावले होते. त्यानंतर या सर्वांनी अस्सी घाट ते नमो घाट नावेतून प्रवास केला. दरम्यान या प्रवासात त्यांनी नमाज पठण केले आणि फळ, खजूर खात रोजा सोडला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये एका मोठ्या पातेल्यातून काहीतरी पदार्थ काढण्यात आला. भाजयुमो महानगरचे अध्यक्ष रजत जयस्वाल यांनी आरोप केला आहे की, या पातेल्यात बिर्याणी होती. नावेत इफ्तार पार्टीसाठी आलेल्या सर्वांनी बिर्याणी खाल्ली आणि नंतर त्याची हाडं पवित्र गंगा नंदीच्या पात्रात फेकल्याचा आरोप करत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
advertisement
[video width="1920" height="1080" mp4="https://images.news18.com/news18marathi/uploads/2026/03/iftar-party-2026-03-16f8316b83789418b9a0bca5bba6b44b.mp4"][/video]
गंगा ही भारती यांसाठी केवळ एक नदी नाही, ती जीवनदायिनी आणि मोक्षप्रदायिनी आहे. गंगा नदीचे पाणी हे पवित्र असून अनेक जण पाणी ग्रहण देखील करतात. जे धर्म अवलंबतात, त्यात दैवी आणि मानवी मूल्ये यांना महत्त्व देतात, त्या लोकांसाठी गंगा ही सर्वार्थाने ‘माता’ आहे. अशा पवित्र गंगा नदीपात्रात बिर्याणी खाऊन त्याची हाडे फेकण्याचा प्रकार निंदनीय आहे. हा प्रकार जाणूनबुजून हिंदू धर्मियांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न आहे. एवढच नाही तर नाव चालकाच्या विरोधात देखील कडक कारवाईची मागणी जयस्वाल यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
गंगा नदीपात्रात रंगली इफ्तार पार्टी, चिकण बिर्याणी खाऊन हाडं फेकली; हिंदूत्ववादी संघटना आक्रमक
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement