नवी विमानतळामुळे वाढले जागांचे भाव, स्वस्तात प्लॉट खरेदी करण्याची संधी, सिडकोकडून लिलाव, कसा करायचा अर्ज?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सिडको नवी मुंबईतील 30 भूखंडांचा लिलाव आज, विमानतळाजवळील खारघर, ऐरोली, नेरुळसह विविध नोड्समध्ये; निवासी व व्यावसायिक वापरासाठी मोठी संधी.
नवी मुंबईत स्वत:ची जागा घेण्याचं ज्यांचं स्वप्न आहे ते आज पूर्ण होणार आहे. अशी संधी कुठेही मिळणार नाही, त्याचं कारण म्हणजे सिडकोकडून आज काही भूखंडांचा लिलाव होणार आहे. यामध्ये काही व्यावसायिक भूखंडाचा देखील समावेश आहे. हे भूखंड विमानतळापासून अवघ्या 20-30 मिनिटांच्या अंतरावर आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होणार असल्याने या परिसरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी मागणी वाढली. ही वाढती मागणी लक्षात घेऊन, नवी मुंबईसाठी सिडकोने नागरिकांना नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. सिडकोने विमानतळाच्या अगदी जवळ वेगवेगळ्या भागांत भाडेपट्ट्यावरील 30 महत्त्वाचे भूखंड लिलावासाठी काढले आहेत.
कुठे होणार लिलाव?
या भूखंडाचा लिलाव आज 16 ऑक्टोबर रोजी होणार असून 17 ऑक्टोबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. सामान्य नागरिक सिडकोच्या भूखंडांसाठी eauction.cidcoindia.com या वेबसाइटवर अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्घाटन केले असून, डिसेंबर 2025 पर्यंत येथील व्यावसायिक कामकाज सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे, विमानतळ सुरू होण्यापूर्वीच या भागातील मालमत्ता खरेदी करण्याची ही मोठी संधी मानली जात आहे.
advertisement
30 भूखंड निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी
सिडकोने 24 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, हे 30 भूखंड नवी मुंबईच्या अनेक नोड्समध्ये आहेत. या लिलावात खास करून आठ बंगल्यांच्या भूखंडाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, आठ भूखंड केवळ निवासी इमारतींच्या बांधकामासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. उर्वरित भूखंडांमध्ये चार भूखंड निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी, चार केवळ व्यावसायिक वापरासाठी, तर काही भूखंड स्टोरेज आणि गोदाम यांसारख्या सेवा उद्योगासाठी वाटप केलं जाणार आहे.
advertisement
भूखंडांचे स्थान आणि किमती
लिलावासाठी उपलब्ध असलेले हे 30 भूखंड खारघर, ऐरोली, नेरुळ, द्रोणागिरी, नवीन पनवेल, कोपर खैरणे, सानपाडा आणि कळंबोली यांसारख्या वेगवेगळ्या नोड्समध्ये पसरलेले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व भूखंड नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून केवळ 30 ते 45 मिनिटांच्या अंतरावर आहेत, ज्यामुळे त्यांचे महत्त्व वाढले आहे.
सिडकोने यावेळी सर्वात महागडा भूखंडही लिलावासाठी ठेवला आहे. निवासी आणि व्यावसायिक वापरासाठी असलेला 41,994 चौरस मीटरचा हा भूखंड असून, त्याची मूळ राखीव किंमत प्रति चौरस मीटर 3.51 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या भूखंडाची एकूण आधारभूत किंमत 40 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. याव्यतिरिक्त, 400 ते 500 चौरस मीटर क्षेत्रफळाचे आठ बंगल्यांचे भूखंड प्रति चौरस मीटर 1.25 लाख या राखीव दराने लिलावात विक्रीसाठी ठेवले आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 16, 2025 8:51 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवी विमानतळामुळे वाढले जागांचे भाव, स्वस्तात प्लॉट खरेदी करण्याची संधी, सिडकोकडून लिलाव, कसा करायचा अर्ज?