Navi Mumbai : मानखूर्दमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अलर्ट, पथकाला 'त्या' संशयास्पद बॅगेत काय काय सापडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नवी मुंबईच्या मानखुर्दमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात संशयास्पद बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याची अफवा पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली होती.
Navi Mumbai News : नवी मुंबईच्या मानखुर्दमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात संशयास्पद बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याची अफवा पसरली होती. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ माजली होती. त्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तत्काल दाखल होऊन तपासणी केली होती.या तपासणीअंती बॉम्ब शोधक पथकाला कोणतीली संशयास्पद वस्तू सापडली नव्हती. त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात संशयास्पद बॉम्बसदृश्य वस्तू ठेवल्याची अफवा पसरली होती. या अफवेनंतर परिसरात खळबळ माजली होती आणि नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मिलन ज्वेलर्ससमोर तत्काळ पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक दाखलं झालं होतं. या पथकाने घटनास्थळावरून एक बॅग ताब्यात घेतली होती.या बॅगेची बॉम्बशोधक पथकाने तपासणी केली होती. पण या बॅगमध्ये पोलिसांना कोणत्याही प्रकारची संशयास्पद वस्तु सापडली नव्हती.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर काटेकोर तपासणी केली होती. या तपासणीत देखील पोलिसांना काहीच सापडले नाही. त्यामुळे नागरीकांनी सुटकेटा निश्वास सोडला होता.
advertisement
बॉम्ब शोधक पथकाच्या तपासणीनंतर कोणताही स्फोटक किंवा संशयास्पद वस्तू आढळली नसल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Location :
Navi Mumbai Panvel Raigarh,Raigad,Maharashtra
First Published :
December 05, 2025 11:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navi Mumbai : मानखूर्दमध्ये बॉम्ब ठेवल्याचा अलर्ट, पथकाला 'त्या' संशयास्पद बॅगेत काय काय सापडलं?


