डॉक्टरकडून मामे बहिणीवर हल्ला आणि बलात्काराचा प्रयत्न, नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार

Last Updated:

रुग्णालयातील केबिनमध्ये आरोपीने मद्यधुंद अवस्थेत नात्यातील आते-बहीण असलेल्या महिलेला मारहाण करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.

नवी मुंबई पोलीस
नवी मुंबई पोलीस
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी, ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील २८ वर्षीय महिलेवर तिचाच नातेवाईक पेशाने डॉक्टर असलेल्या मामे भावाने स्वतःच्याच रुग्णालयात हल्ला करून बलात्काराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित महिलेने आपल्यावरील आपबीती कथन केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉक्टरचे ऐरोली सेक्टर ६ मध्ये स्वतःचे हॉस्पिटल आहे. याच रुग्णालयातील केबिनमध्ये आरोपीने मद्यधुंद अवस्थेत नात्यातील आते-बहीण असलेल्या महिलेला मारहाण करून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप पीडित महिलेने केला आहे.
या घटनेनंतर महिलेनं रबाळे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे, पंतप्रधानांचा कार्यक्रमाचा बंदोबस्तामुळे विलंब झाला असून आरोपी विरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. तक्रारदार महिला व आरोप झालेला डॉक्टर हे दोघेही नातेवाईक आहेत. यामुळे सखोल चौकशी करत असल्याचं रबाळे पोलिसांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
डॉक्टरकडून मामे बहिणीवर हल्ला आणि बलात्काराचा प्रयत्न, नवी मुंबईतला धक्कादायक प्रकार
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement