ताई अन् दादांचं जुळलं, भावजयीने दिलेली रिॲक्शन कॅमेऱ्यात कैद, पवार कुटुंबात काय चाललंय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यानंतर अजित पवारांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळेंच्या भावजय सुनेत्रा पवार यांची रिअॅक्शन समोर आली आहे.
महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. पुण्यासह पिंपरी चिंचवड महानगर पालिका निवडणुकीसाठी हे दोन्ही गट एकत्र आले आहेत. पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे युती झाल्याने या युतीचं अनेकांनी स्वागत केलं असलं तरी काही जणांकडून टीका देखील होत आहे. पण महानगर पालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यांच्या मताचा आदर करुन आम्ही एकत्र आलो, अशी भूमिका दोन्ही पक्षाकडून मांडण्यात आली आहे.
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्रित पत्रकार परिषद देखील घेतली. यावेळी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित होते. या पत्रकार परिषदेतून अजित पवारांनी दोन्ही पक्षांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. पिंपरी चिंचवड साठी आपलं प्लॅनिंग काय आहेत? हेही अजित पवारांनी सांगितलं. सुप्रिया सुळे आणि अजित पवार एकाच मंचावर अशाप्रकारे आल्याने विविध चर्चांना उधाण आलं.
advertisement
दरम्यान आता दादा आणि ताई एकत्र आल्यानंतर अजित पवारांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळेंच्या भावजय सुनेत्रा पवार यांची रिअॅक्शन समोर आली आहे. ताई आणि दादा एकत्र येण्याबद्दल विचारलं असता सुनेत्रा पवार यांनी थेट हातच जोडले. त्यांनी यावर थेटपणे प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. एकीकडे ताई - दादा एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असताना सुनेत्रा पवारांनी दिलेल्या रिअॅक्शनमध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
advertisement
राष्ट्रवादीचे दोन्ही एकत्र येण्यावर सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया pic.twitter.com/N4L2w6InVK
— News18Lokmat (@News18lokmat) January 10, 2026
खरं तर, बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद भावजय आमने सामने होत्या. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार निवडणूक लढवत होत्या. तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे मैदानात होत्या. नणंद भावजयच्या या निवडणुकीत नणंदेनं बाजी मारली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया काय असेल? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अशात आता त्यांनी या युतीबाबत थेट हात जोडल्याने पवार कुटुंबात नक्की काय सुरू आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 2:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ताई अन् दादांचं जुळलं, भावजयीने दिलेली रिॲक्शन कॅमेऱ्यात कैद, पवार कुटुंबात काय चाललंय?









