बुलढाण्यात पाकिस्तान जिंदाबाद नारेबाजीचा VIDEO VIRAL, चौघांवर गुन्हा दाखल
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
बुलढाण्यात ईद निमित्त आयोजित मिरवणुकीवेळी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्याचा आरोप बजरंग दलाने केलाय.
राहुल खंडारे, प्रतिनिधी
बुलढाणा : बुलढाण्यात पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आल्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नांदुरा तालुक्यातल्या वडनेर भोलजी गावातले हे व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येतंय. ईद निमित्त आयोजित मिरवणुकीवेळी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्याचा आरोप बजरंग दलाने केलाय. या प्रकऱणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. घोषणाबाजीचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र या व्हिडीओची सत्यता तपासण्यात आलेली नाही.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवरून बजरंग दलाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली. नांदुरा पोलिसात ४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर बुलढाण्यात मोठी खळबळ उडालीय. पोलिसात गुन्हा दाखल झाला असला तरी या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. पोलीस आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून अधिक चौकशी करत आहेत.
बजरंग दलाने केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, वडनेर भोलजी इथल्या परिसरातले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. देशविरोधी घोषणाबाजी यात देण्यात आलीय. व्हायरल झालेल्या व्हिडीओची सखोल चौकशी आणि तपासणी करावी. संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बजरंग दलाने केलीय.
advertisement
बुलढाण्यात शेगावमध्ये आठवड्याभरापूर्वी गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीची घटना घडली होती. विसर्जन मिरवणुकीवर अज्ञातांकडून दगडफेक केली होती. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2024 1:23 PM IST


