Plaghar Factory blast: मेटल-अॅसिड एकत्र करताना भयंकर स्फोट, पालघर हादरलं, एकाचा मृत्यू, 5 गंभीर जखमी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पालघरच्या लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीजमध्ये स्फोटात दीपक अंधारे यांचा मृत्यू, सुरेश कोम व दिनेश गडग गंभीर जखमी, चौकशी सुरू असून पोलिस व अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणली.
पालघर जिल्ह्यात एका केमिकल फॅक्टरीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य चार कामगार जखमी झाले आहेत. हा स्फोट गुरुवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीजमध्ये झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, घटनेच्या वेळी पाच कामगार फॅक्टरीत मेटल आणि ॲसिड मिसळण्याचे काम करत होते. ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक असल्याने यामुळेच स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या स्फोटात शिरोली येथील रहिवासी दीपक अंधारे (३८) यांचा जागीच मृत्यू झाला. सुरेश कोम (५५) आणि दिनेश गडग (४०) हे गंभीर भाजले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, तर लक्ष्मण मंडल (६०) आणि संतोष तारे (५१) यांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Location :
Palghar,Thane,Maharashtra
First Published :
September 19, 2025 11:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Plaghar Factory blast: मेटल-अॅसिड एकत्र करताना भयंकर स्फोट, पालघर हादरलं, एकाचा मृत्यू, 5 गंभीर जखमी