पंकजा मुंडे यांच्या भाषणात चुकून वनवासाऐवजी संन्यास उल्लेख, सावरत म्हणाल्या तिकडे जायचं नाही!

Last Updated:

राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे राज्यसभा खासदार ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे भोकर विधानसभा मतदारसंघात आल्या होत्या.

पंकजा मुंडे
पंकजा मुंडे
नांदेड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून भाषणात चुकून राजकीय वनवासाऐवजी संन्यास असा उल्लेख झाला. आपली चूक लक्षात येताच लगेच संन्यासाकडे आपल्याला जायचं नाही, असे त्या म्हणाल्या. लोकांनीही त्यांच्या हजरजबाबीपणाला टाळ्यांनी दाद दिली.
राज्याचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे राज्यसभा खासदार ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे भोकर विधानसभा मतदारसंघात आल्या होत्या. भोकरच्या विकासासाठी श्रीजया चव्हाण यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंकजा मुंडे यांच्या भाषणादरम्यान त्यांच्याकडून राजकीय वनवास याऐवजी राजकीय संन्यास असा चुकून उल्लेख झाला. पण लगोलग सावरत मला राजकीय वनवास म्हणायचे होते. आपल्याला संन्यासाकडे जायचे नाही, असे त्या म्हणाल्या.
advertisement
प्रचारासाठी मरमर करतेय, आपल्याला यश नक्की मिळेल
विधानसभा निवडणुकांच्या सभांसाठी खूप फिरावे लागत असल्याने जेवणही मिळत नाही. मिळेल ते जेवण हॅलिकॉप्टर मध्येच बसून खावे लागत आहे. विधानसभेच्या प्रचारासाठी मरमर करतोय, कष्ट करतोय, आपल्याला यश नक्की मिळेल, असे पंकजा म्हणाल्या. माझा मोठ्या घरी जन्म होऊनही अनेक कष्टांना मला सामोरे जावा लागले. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर अनेक दुःख पेलली, असेही पंकजा म्हणाल्या.
advertisement
शंकरराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत आलीये, या भूमीला जनसेवेचा वारसा
जेष्ठ नेते स्व. शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेल्या नांदेड जिल्हातील भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीजया अशोक चव्हाण आणि नांदेड लोकसभा मतदारसंघ भाजप महायुतीचे उमेदवार संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ आज आयोजित केलेल्या भव्य जाहीर सभेस संबोधित केले. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांचा समाजकारणाचा वारसा यशस्वीपणे चालवणाऱ्या श्रीजया निवडून आल्यानंतर देखील मतदारसंघातील जनतेने दिलेल्या जनसेवेचा वसा नक्कीच योग्यरीतीने सांभाळतील यात काही शंका घेण्याचे कारण नाही, असे पंकजा म्हणाल्या.
advertisement
श्रीजयला निवडून द्या, विधिमंडळात आपल्या मराठवाड्याचा आवाज बुलंद करा
त्यामुळे, येत्या वीस तारखेला कमळासमोरील बटण दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून विधिमंडळात आपल्या मराठवाड्याचा आवाज आपण बुलंद करावा असे आवाहन उपस्थितांना केले.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पंकजा मुंडे यांच्या भाषणात चुकून वनवासाऐवजी संन्यास उल्लेख, सावरत म्हणाल्या तिकडे जायचं नाही!
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement