Anant Garje: गर्जेच्या वकिलांचा कोर्टात धक्कादायक दावा म्हणाले, 2021 चं प्रकरण...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. दरम्यान अनंत गर्जेच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे
भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे-गर्जेनं आत्महत्या केलीय. या धक्कादायक घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. गौरीचे पती अनंत गर्जे यांचे किरण इंगळे नावाच्या महिलेशी अनैतिक संबंध होते. घर बदलताना गौरीला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्य
या अफेअरबाबत विचारणा केली असता तुला जे करायचं ते कर मी कोणाला घाबरत नाही...तू कोणाला सांगितलंस तर तुझं नाव चिठ्ठीत लिहून आत्महत्या करेन अशी धमकी पतीनं दिल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान अनंत गर्जेच्या वकिलांनी धक्कादायक दावा केला आहे. गौरीच्या घरच्यांना अनंतच्या जुन्या संबंधांविषयी माहिती असल्याचा दावा अनंत गर्जेचे वकील मंगेश देशमुख यांनी केला आहे.
advertisement
अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच मोठ्या थाटामाटात गौरी आणि अनंत यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. नव्या संसाराची स्वप्न घेऊन डॉ. गौरी गर्जेच्या घरी नांदायला आल्या होत्या. मात्र वर्षभराच्या आतच त्यांना मृत्यूला कवटाळला लागलंय. डॉ. गौरी पालवे-गर्जे यांनी वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. शनिवारी संध्याकाळी वरळीतील राहत्या घरी गौरी यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. या प्रकरणी अटक
advertisement
अनंत गर्जेचे वकील मंगेश देशमुख म्हणाले, अनंत गर्जे रात्री साडेबारा वाजता पोलिसांसमोर सरेंडर झालेले आहेत. घडलेली दुर्घटना ही अत्यंत वाईट आहे. आम्ही स्वतःहून सरेंडर झालेलो आहोत. 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. पण 4 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे. जे माध्यमांसमोर पसरवलं जात आहे तसं काही नाही आहे.
अनंत गर्जेचा फोन पोलिसांकडे
advertisement
चे महिलेशी संबंध प्रकरण ही 2021 साली होते. चार वर्षापूर्वीची घटना आहे ते आता का जोडले जात आहे. ही घटना दोन्ही कुटुंबांना माहिती आहे. त्या नंतरच दोघांनी लग्न केलं आहे, सर्वांच्या संमतीने लग्न करण्यात आलं होतं.- तपास यंत्रणा निश्चित तपास करतील आणि योग्य तो रिपोर्ट आपल्यासमोर मांडतील. पोलिसांना सर्व कागदपत्र हे गोळा करायचे आहे. अनंत गर्जे यांचा मोबाईल देखील पोलिसांकडे सोपवण्यात आलेला आहे.
advertisement
घरांच्या चाव्या देखील पोलिसांकडे सोपवण्यात आले.
नणंदेच्या आरोपावर वकील काय म्हणाले?
अनंत गर्जेच्या बहिणीवर झालेलया आरोपावर बोलताना वकील म्हणाले, दीर आणि नणंद या दोन्ही सरकारी कार्यालयात कामाला आहेत. 1 तारखेपासून हे भाडेतत्त्वावरती राहण्यास आले होते. बहिण ही मुंबईत कधीच अनंत गर्जे याच्या राहत्या घरी आली नाही.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 24, 2025 5:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Anant Garje: गर्जेच्या वकिलांचा कोर्टात धक्कादायक दावा म्हणाले, 2021 चं प्रकरण...


