परभणीतील घटनेचे धुळ्यात पडसाद, दसरा चौकात प्रवासी असलेल्या एसटीवर दगडफेक

Last Updated:

धुळ्यात एसटी बसने प्रवेश करताच आठ दहा जणांनी गाडीवर दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांनी तोंडाला मास्क लावले होते.

News18
News18
धुळे :  परभणी येथील घटनेचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह बीड, नांदेड, लातूर, यवतमाळमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.तर या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल आहे. एसटीवर दगडफेक, तोडफोडीची घटना घडल्या आहेत.
संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. या युवकाला 11 डिसेंबर रोजी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटकेत होता, या प्रकरणाचा निषेध राज्यभरात करण्यात येत आहे.परभणीच्या घटनेचे पडसाद धुळ्यात देखील उमटल आहेत. धुळे शहरात एसटी बसवर दगडफेक करण्यात आली आहे. नाशिक शहादा बसवर दगडफेक करण्यात आली आहे. धुळे शहरातील दसरा मैदान चौकात ही घटना घडली आहे.
advertisement

आठ दहा जणांनी गाडीवर दगडफेक केली

दगडफेकीच्या या घटनेत प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी तात्काळ दाखल झाले आहेत.अज्ञात पाच ते आठ जणांकडून दगडफेक झाल्याचा दावा चालकाने केला आहे. पोलिस या घटनेता तपास करत आहेत. धुळ्यात एसटी बसने प्रवेश करताच आठ दहा जणांनी गाडीवर दगडफेक केली. दगडफेक करणाऱ्यांनी तोंडाला मास्क लावले होते.
advertisement

कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्या

सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यूचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.या मारहाणीचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज बीड कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी सांगितलं. परभणीमध्ये संविधानाच्या विटंबना करण्याच्या प्रकारानंतर जे आंदोलन झाले त्या आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल झालेत ते मागे घ्यावेत. ज्यांनी कोणी हा प्रकार केला त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी ऑल इंडिया पँथरचे जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी केली..
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
परभणीतील घटनेचे धुळ्यात पडसाद, दसरा चौकात प्रवासी असलेल्या एसटीवर दगडफेक
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement