'लेकरांना अटक झाली तर..'; बीडच्या इशारा सभेपूर्वीच जरांगे पाटलांनी सांगितला प्लॅन
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
मनोज जरांगे पाटील यांची उद्या बीडमध्ये इशारा सभा होणार आहे. या सभेपूर्वीच त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
परभणी, 22 डिसेंबर : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. मात्र 24 तारखेला आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही सरकारला अद्यापपर्यंत आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढता आलेला नाहीये. या पार्श्वभूवीवर उद्या मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये सभा होणार आहे. मात्र बीडच्या सभेपूर्वीच त्यांनी सरकारवर घणाघात केला आहे. ते परभणीमधील सेलूमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
या आधी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आता लेकरांना आरक्षण दिल्याशिवाय मागे हाटणार नाही. आंदोलन अजून जाहीर केलं नाही, मग विनाकारण नोटीस का? आमचं मुंबईला जायचं ठरलं तर तुम्हाला अडचण काय? लेकरांना अटक झाली तर सर्वांनीच पोलीस ठाण्यात जाऊन बसायचं, करायची तर सर्वांनाच अटक करा. सरकारला कायदा पारित करण्यात अडचण काय आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
उद्या बीडमध्ये जरांगेंची इशारा सभा
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची 23 डिसेंबरला बीड शहरात पाटील मैदानावर इशारा सभा होणार आहे. सभेच्या स्थळावर तब्बल अकरा हजार झेंडे तर इतर ठिकाणी दहा हजार असे 21 हजार झेंडे या सभेसाठी लावण्यात आले आहेत. सभेची तयारी अंतीम टप्प्यात आल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळ आणि बीड शहरात जागोजागी फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत. या सभेमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्यानं सर्वाचं लक्ष या सभेकडे लागलं आहे.
Location :
Parbhani,Parbhani,Maharashtra
First Published :
Dec 22, 2023 1:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/परभणी/
'लेकरांना अटक झाली तर..'; बीडच्या इशारा सभेपूर्वीच जरांगे पाटलांनी सांगितला प्लॅन









