Ulhasnagar: सोसायटीच्या टेरेसवर गेला अन् अंगावर डिझेल ओतून स्वत:ला संपवलं, उल्हासनगर हादरलं
- Published by:Sachin S
- Reported by:GANESH GAIKWAD
Last Updated:
उल्हासनगरमधील कॅम्प नंबर पाचच्या गांधी रोड परिसरात ही घटना घडली आहे. या भागातील लक्ष्मीनारायण पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर हा प्रकार घडला
उल्हासनगर : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या टेरेसवर एका व्यक्तीने स्वत: च्या अंगावर ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेत या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, मृत्यूचा हा प्रकार एका मोबाइलमध्येही कैद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरमधील कॅम्प नंबर पाचच्या गांधी रोड परिसरात ही घटना घडली आहे. या भागातील लक्ष्मीनारायण पॅलेस या इमारतीच्या टेरेसवर हा प्रकार घडला. विजयकुमार भोजवानी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. विजयकुमार भोजवानी हे याच सोसायटीमध्ये राहत होते.
बुधवारी रात्री ते सोसायटीच्या टेरेसवर गेले होते. बऱ्याच वेळ झाला ते खाली आले नाही. पण, काही वेळानंतर सोसायटीच्या टेरेसवर आग लागल्याचं लोकांच्या लक्षात आलं. लोकांनी टेरेसकडे धाव घेतली असता विजयकुमार भोजवानी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते. घटनास्थळावरच ज्वलनशील द्रव पदार्थाची आणखी एक कॅन आढळून आली.
advertisement
विजयकुमार भोजवानी यांनी आपल्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेतल्याचं समोर आलं. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोसायटीतील सदस्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भोजवानी यांचा मृतदेह जळून राख झाला होता. सध्या अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनानं आग विझवली असून विजयकुमार यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. नैराश्यपोटी त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितलं जातंय. मात्र, या घटनेनं उल्हासनगर शहर हादरलंय. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Ulhasnagar,Thane,Maharashtra
First Published :
July 30, 2025 10:28 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ulhasnagar: सोसायटीच्या टेरेसवर गेला अन् अंगावर डिझेल ओतून स्वत:ला संपवलं, उल्हासनगर हादरलं