VIDEO : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: PSI गोपाल बदणे स्वत:हून फलटण पोलीस ठाण्यात हजर

Last Updated:

साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. PSI गोपाल बदणे हे स्वत:हून फलटण पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. महिला डॉक्टरने हातावर सूसाईट नोट लिहून आत्महत्या केली होती.

Satara News : साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. PSI गोपाल बदणे हे स्वत:हून फलटण पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. महिला डॉक्टरने हातावर सूसाईट नोट लिहून आत्महत्या केली होती.यावेळी महिला डॉक्टरच्या हातावर जी दोन नाव होती, त्यामध्ये PSI गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे होती. यामधील प्रशांत बनकर हे शुक्रवारी रात्रीच पोलीस ठाण्यात हजर झाले होते.त्यानंतर कालपासून बदणे यांचा पंढरपूर पासून पूण्यापर्यंत शोध सातारा पोलीस घेत होते. पण आज PSI गोपाल बदणे हे स्वत:हून फलटण पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. त्यामुळे आता पोलीस त्यांची चौकशी करणार असून घटनेचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिली आतापर्यंतच्या तपासाची माहिती
साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी याप्रकरणी आतापर्यंतच्या तपासाबद्दल माहिती दिली.
महिला डॉक्टरच्या आत्महत्या आणि छळाच्या प्रकरणात घटनेचा सर्व बाजूने तपास सुरू आहे. एका संशयित आरोपींला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला देखील ताब्यात घेतले जाईल. दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न सुरू आहे, असे साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सांगितले.
advertisement
आमच्या अधिकाऱ्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. संबंधित डॉक्टर युवतीने फलटण ग्रामीण पोलिसांबाबत तक्रार केली होती. तंदुरुस्ती प्रमाणपत्राबाबत (फिटनेस सर्टिफिकेट) या तक्रारी होत्या. त्यामुळे पोलिस आणि या डॉक्टर युवतीमध्ये वाद होता, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
पीएच्या मोबाईलवरुन माजी खासदाराने संपर्क साधत आरोपींचे रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव आणल्याचा उल्लेख मृत महिला डॉक्टरने पत्रात केला होता. यावरून माजी खासदार निंबाळकर यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत असताना पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना ते म्हणाले, खासदारांचा उल्लेख हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. खासदारांचे नाव हे मयत डॉक्टरने लिहिलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पत्रात आहे. सध्याच्या गुन्ह्यांशी याचा कोणताही संबंध दिसत नाही, असे सांगत दोशी यांनी निंबाळकर यांना अप्रत्यक्षपणे क्लिनचिट दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण: PSI गोपाल बदणे स्वत:हून फलटण पोलीस ठाण्यात हजर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement