Dhule Accident : धुळ्यात भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची धडक झाली. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.
दीपक बोरसे, प्रतिनिधी
धुळे : धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाटा इथं भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. तर या अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. अपघाताची नोंद पोलिसात झालीय. पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिंदखेडा तालुक्यातल्या दसवेल फाट्याजवळ पिकअप व्हॅन आणि ईको गाडीची धडक झाली. समोरासमोर झालेली ही धडक इतकी भीषण होती की पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात चौघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी धुळ्यातल्या हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हे सर्व शिंदखेडा शहरातील रहिवासी असून ते कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी वारूळ पाष्टे गावाला गेले होते.
advertisement
वारूळ गावातून कीर्तनाचा कार्यक्रम आटपून ही सर्व मंडळी आपल्या घराकडे परतत होते. दरम्यान समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप व्हॅनने या इको कार ला जोरदार धडक दिली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहनाचा चालक हा मदधुंद अवस्थेत असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली असून, त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातामध्ये गंभीर जखमी वर हिरे वैद्यकीय मध्ये उपचार सुरू आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 15, 2024 8:20 AM IST