Pimpari Chinchwad : तळवडे MIDC मधल्या फटका कंपनीला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू
- Published by:Shreyas
 
Last Updated:
Pune Fire News : वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्याच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या तळवडे एमआयडीसीमध्ये ही कंपनी आहे
पिंपरी चिंचवड, 8 डिसेंबर : वाढदिवसाला केकवर लावणाऱ्या मेणबत्ती फटाक्याच्या कंपनीला भीषण आग लागली आहे. पिंपरी चिंचवडमधल्या तळवडे एमआयडीसीमध्ये ही कंपनी आहे. कंपनीला लागलेल्या आगीत आतापर्यंत 7 मृतदेह मिळाले आहेत, तर काही महिला जखमी झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत, अशी माहिती पुणे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये सगळ्या महिला आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध आग विझवल्यानंतर घेतला जाणार आहे. तसचं कंपनी कायदेशीररित्या सुरू होती का? याचा तपासही पोलीस करणार आहेत.
दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास अग्निशमन दलाला कंपनीला आग लागल्याबद्दलचा फोन आला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.
Location :
Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
First Published :
December 08, 2023 5:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pimpari Chinchwad : तळवडे MIDC मधल्या फटका कंपनीला भीषण आग, 7 जणांचा मृत्यू


