२०२६ चं वर्ष या राशींसाठी ठरणार सर्वाधिक संकटाचं, शनिची कडक साडेसाती लागणार, हे परिणाम होणार
- Published by:Ajit Bhabad
 
Last Updated:
Astrology News : हिंदू धर्मानुसार शनिवार हा शनिदेवांचा सर्वात प्रिय दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने शनिदेव आणि हनुमानजींची पूजा केली जाते.
 हिंदू धर्मानुसार शनिवार हा शनिदेवांचा सर्वात प्रिय दिवस मानला जातो. या दिवशी श्रद्धेने शनिदेव आणि हनुमानजींची पूजा केली जाते. कर्माच्या आधारे न्याय देणारे शनिदेव वाईट कृत्य करणाऱ्यांना शिक्षा करतात, तर चांगले कर्म करणाऱ्यांवर आपली कृपा वर्षाव करतात. शनिदेवांच्या कृपेने व्यक्तीच्या आयुष्यात स्थैर्य, यश आणि सुख प्राप्त होते.
advertisement
advertisement
advertisement
 मेष -  मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होतो आहे. या काळात मानसिक दडपण वाढेल आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवेल, पण कठोर परिश्रम करणाऱ्यांना शनिदेवाचे आशीर्वाद लाभतील. व्यवसायात चढ-उतार होतील आर्थिक नियोजन काळजीपूर्वक करावे लागेल. घरातील जबाबदाऱ्या वाढतील आणि मुलांबद्दल चिंता राहू शकते. वाहन चालवताना किंवा प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी प्रत्येक शनिवारी काळे तीळ आणि तेलाचे दान शुभ ठरेल.
advertisement
 कुंभ  - कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या काळात थकवा, पायांशी संबंधित त्रास आणि मानसिक तणाव वाढू शकतो. कामकाजात अडथळे येतील, आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी संभवतात. शत्रूंचा त्रास वाढू शकतो, त्यामुळे सावधगिरी आवश्यक आहे. शनीच्या वक्री अवस्थेत जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात. जुन्या आजाराचा त्रास वाढू शकतो. या काळात संयम आणि आत्मविश्वास टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. शनिदेवाची प्रसन्नता मिळवण्यासाठी शनि मंदिरात तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.
advertisement
 मीन - मीन राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. शनिदेव या राशीतच भ्रमण करत असल्याने, त्यांच्या परिणामाची तीव्रता अधिक जाणवेल. या काळात जास्त मेहनत घ्यावी लागेल आणि अनावश्यक चिंता मनात राहील. वैयक्तिक नात्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात, आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत दक्षता घ्या; जुन्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. शनिदेवाच्या वक्री गतीत विश्वासू वाटणाऱ्या लोकांपासून सावध राहणे हितावह ठरेल. शनिवारी उपास, दान आणि हनुमान चालीसा पठण यामुळे मानसिक स्थैर्य लाभेल.


