संजय राऊत यांची प्रकृती बिघडली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट, नेमकं काय म्हणाले?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
संजय राऊतांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट केले आहे.
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. या बाबतची माहिती संजय राऊत यांनी स्वतः एका निवेदनाद्वारे दिली आहे. त्यानंतर आता संजय राऊत यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट करत राऊतांची प्रकृती लवकर ठीक व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
शिवसेना ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांना गंभीर आजार झाल्याची माहिती समोर आलीय. यामुळे संजय राऊतांनी पुढील दोन महिने सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. ते आता थेट नवीन वर्षात सार्वजनिक जीवनात पुनरागमन करणार आहे. खासदार संजय राऊत सध्या आजारी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पंतप्रधानांच्या या ट्वीटनंतर संजय राऊत यांनी देखील त्यांचे आभार मानले आहे.
advertisement
राजकारण बाजूला सारून माणुसकी आणि राजकीय संस्कृतीचं दर्शन घडल्याचं बघायला मिळत आहे
स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर संजय राऊत यांना प्रकृती अस्वस्थ्यामिुळे सार्वजनिक जीवनापासून दूर राहावे लागणार असल्याने ही बाब ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्यासाठी खास पोस्ट लिहून त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा, यासाठी प्रार्थना केली आहे.
advertisement
Praying for your speedy recovery and good health, Sanjay Raut Ji.@rautsanjay61 https://t.co/nGgRFO4AhS
— Narendra Modi (@narendramodi) October 31, 2025
सुषमा अंधारे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत त्यांच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. सुषमा अंधारे यांनी या पोस्टची सुरुवात ’मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, अशा शब्दात केली आहे. 'लवकर बरे व्हा. आम्हाला कल्पना आहे की सार्वजनिकरीत्या जरी आपण मिसळू शकणार नसलात तरी सुद्धा इथल्या पाताळयंत्री अजस्त्र महाकाय शक्तीविरोधात जी लढाई आपण उभी केलेली आहे; त्या लढाईला वैचारिक रसद या दोन महिन्यांतसुद्धा आपण पुरवत राहणार आहात, असा विश्वास अंधारे यांनी व्यक्त केला.
advertisement
संजय राऊत काय म्हणाले?
सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीवाद असेच राहू द्या, असं संजय राऊत म्हणाले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 6:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
संजय राऊत यांची प्रकृती बिघडली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट, नेमकं काय म्हणाले?


