Amitabh Bachchan : खून का बदला खून! अमिताभ बच्चन यांच्या जीवाला धोका, KBC चा विशेष एपिसोड कोणाच्या रडारवर
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Amitabh Bachchan : केंद्रिय एजन्स्यांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर हल्ल्याची शक्यता व्यक्त केली आहे. नुकत्याच ‘कौन बनेगा करोडपती’ च्या एका भागात पंजाबी गायक आणि अभिनेते दिलजीत दोसांझ आले होते, ज्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी भरपूर संवाद साधला. यावेळीच त्यांनी याबाबत भाष्य केलं.
advertisement
advertisement
 अमिताभ बच्चन यांच्या पायाला स्पर्श केल्यानंतर दिलजीत दोसांझ यांना खलिस्तानी संघटना “सिक्स फॉर जस्टिस” (SFJ) कडून धमकी मिळाली होती. SFJ चे प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू यांनी इशारा दिला की 1 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या दोसांझ यांच्या कॉन्सर्टला बंद पाडण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच 1984 मधील शीखविरोधी दंगलीतील पीडितांचा अपमान केल्याचा आरोप केला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


