Suryakumar Yadav : T20 वर्ल्ड कप 98 दिवसांवर, कॅप्टन्सी सोडा, सूर्याचं करिअरही संकटात, टीम इंडियात चाललंय काय?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताचा 18.4 ओव्हरमध्ये 125 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे पुन्हा एकदा टीमच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताचा 18.4 ओव्हरमध्ये 125 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे पुन्हा एकदा टीमच्या बॅटिंगवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टी-20 वर्ल्ड कप आता अवघ्या तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपला आहे, त्याआधी टीम इंडियाचे कमी सामने शिल्लक आहेत, त्यामुळे प्रशिक्षक गौतम गंभीर तसंच कर्णधार सूर्यकुमार यादव यांना चुका सुधारण्यासाठी वेळही कमी मिळणार आहे. 6 फेब्रुवारीपासून टी-20 वर्ल्ड कपला सुरूवात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे स्पर्धेला आता फक्त 98 दिवस शिल्लक आहेत.
टीम इंडियासाठी सगळ्यात चिंतेची बाब हा सूर्यकुमार यादवचा फॉर्म आहे. मागच्या 15 टी-20 सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने 12.08 ची सरासरी आणि 106.61 च्या स्ट्राईक रेटने फक्त 145 रन केल्या आहेत. पावसामुळे रद्द झालेल्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये वाटत होता, पण दुसऱ्या मॅचमध्ये तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. 4 बॉलमध्ये 1 रन करून सूर्या आऊट झाला. भारताने 2024 टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सूर्याच्या फॉर्ममध्ये कमालीची घसरण झाली आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतरच्या 22 इनिंगमध्ये त्याने 19.5 च्या सरासरीने आणि 142.9 च्या स्ट्राईक रेटने 370 रन केले आहेत. सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी-20 फॉरमॅटमध्ये शेवटचं अर्धशतक वर्षभरापूर्वी केलं आहे. मागच्या 6 टी-20 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये सूर्याचा स्कोअर 0, 5, 12, 1, 39*, 1 असा आहे.
advertisement
मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्याआधी सूर्यकुमार यादवने यावर्षीच्या 11 इनिंगमध्ये 11 च्या सरासरीने फक्त 100 रन केल्या ऐआहे. तर कर्णधार झाल्यानंतर सूर्याची बॅटिंग सरासरी 29 सामन्यांमध्ये 25.2 एवढी आहे. कॅप्टन व्हायच्या आधी त्याने 61 सामन्यांमध्ये 43.4 च्या सरासरीने रन केल्या होत्या.
आशिया कपआधी निवड समितीने शुभमन गिलची टी-20 टीमचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती केली, तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गिल भारताच्या वनडे टीमचा कर्णधार झाला. त्यामुळे गिल भविष्यात भारताचा टी-20 टीमचाही कर्णधार होणार आहे. सूर्यकुमार यादवने मात्र त्याच्या फॉर्मबद्दल चिंता नसल्याचं वक्तव्य केलं आहे. 'मी कठोर मेहनत करत आहे. नेट सेशनमध्ये मी चांगली बॅटिंग केली आहे. रन येतील, पण मी टीमच्या गोलसाठीही काम करत आहे. टीमला कठीण परिस्थितीमध्ये काय हवं आहे, हे जास्त महत्त्वाचं आहे', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 5:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Suryakumar Yadav : T20 वर्ल्ड कप 98 दिवसांवर, कॅप्टन्सी सोडा, सूर्याचं करिअरही संकटात, टीम इंडियात चाललंय काय?


