मध्य रेल्वेने रोज प्रवास करताय सावधान! मोबाईल चोरणारी फटका गँग पुन्हा सक्रिय, 'हे' तीन स्टेशन टार्गेटवर
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बाजारामध्ये, रेल्वे स्थानकांवर आणि रस्त्यावरही चालता चालता मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये वाढ होत आहे. खरंतर गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना आपण घडताना पाहतो. आता अशातच मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये शहरांमध्ये दिवसेंदिवस प्रमाण वाढताना दिसत आहे.

advertisement
advertisement
advertisement
advertisement
 दरदिवशीच्या तुलनेत, 29 ऑक्टोबर रोजी, तब्बल 17 मोबाईल चोरींचे गुन्हे दाखल झाल्याने प्रवासी संताप झाले. एकाच दिवसात रेल्वे पोलिसांत इतके गुन्हे दाखल झाल्यामुळे नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया मिळत आहे. नियमित मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांचा पर्दाफाश का होत नाही? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
advertisement
advertisement
 मुंब्रा, कळवा आणि ठाणे रेल्वे स्थानकावर दिवसाला हजारो प्रवासी कामानिमित्त प्रवास करत असतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गर्दीमुळे प्रवाशांच्या आवश्यक वस्तूंची नियमित चोरी होणे, ही घटना काही नवीन नाही. परंतू दिवसाला इतक्या मोठ्या प्रमाणावर चोरीच्या घटना घडत असेल पोलीस ॲक्शनमोडवर येणं गरजेचं आहे. रेल्वे पोलिस या चोरट्यांवर केव्हा ॲक्शन घेणार पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.