हंसल मेहतांचं डूबतं करिअर सासऱ्यांनी वाचवलं, होते प्रसिद्ध अभिनेते, कधी काळी विकायचे कपडे
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Bollywood Actor : अभिनेता युसुफ हुसैन यांनी अनेक फिल्ममधून काम केले होते. त्यांनी आपल्या जावयाला कर्जमूक्त केले होते.
बॉलिवूड निर्माते हंसल मेहता यांचे सासरे म्हणजे बॉलिवूड अभिनेते युसुफ हुसैन. यांनी आपल्या जावयाला एका मोठ्या तणावातून बाहेर काढले होते. एक चित्रपट होता ज्यामुळे निर्माते हंसल मेहता यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा झाला होता. त्यांचे सासरे युसुफ यांनी बॉलिवूड मध्ये कायमच साहाय्यक भूमिका केल्या, ज्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती. अनेक चित्रपटातून ते सहाय्यक भूमिकेतून दिसले होते. त्यांना कधीच वाटले नव्हते की ते अभिनय क्षेत्रात काम करतील. ते अपघाताने या क्षेत्रात आले होते.
अभिनेते युसुफ हुसैन यांचा जन्म 21 जानेवारी 1948 मध्ये झाला. त्यांना त्यांच्या नशीबानेच या मोठ्या पडद्यावर आणले होते, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. त्यांची 'ओ माय गॉड' या चित्रपटातील जजची भूमिका, शाहरुखच्या 'रईस' फिल्म मधील भूमिका असेल किंवा 'धूम 2' मध्ये ऋतिक रोशन सोबतचा सीन असेल. या सर्व फिल्ममधून त्यांनी चाहत्यांच्या मनात घर केले होते.
advertisement
व्यवसाय ते अभिनय असा प्रवास
'सीआईडी' मालिकेच्या कित्येक भागांमधून अभिनेते युसुफ हुसैन हे वेगवेगळ्या भूमिकेत दिसले होते. त्यानंतर कुमकुम, प्यारा सा बंधन सारख्या हिंदी मालिके मधून ते घराघरात पोहोचले. त्यांचा आवाज, संवाद फेक आणि हावभाव एवढे नैसर्गिक होते की प्रेक्षकांना त्यांची भूमिका लक्षात राहायची आणि खूप आवडायची. त्यांचा लखनऊ मध्ये कपड्यांचा व्यवसाय होता. पण त्यांचा कधी थिएटरसोबत संबंध आला नव्हता. त्यांनी कधीच थिएटर अभिनय केला नाही. त्यांना जेव्हा एक चांगली संधी मिळाली तेव्हा त्यांनी संधीचा फायदा घेऊन स्वतःतील अभिनयाच्या कौशल्याला वाव दिला.
advertisement
पैशांमुळे फिल्म अडकली होती
अभिनेते युसुफ हुसैन यांचे जावई हंसल मेहता यांची एक 'शाहिद' नावाची फिल्म होती. ती फिल्म वकील आणि कार्यकर्ता शाहिद आजमी यांच्या जीवनावर आधारीत होती. त्या फिल्मचे सुरुवातीचे शेड्यूल कसेबसे पूर्ण केले होते, पण त्यानंतर ती फिल्म पैशाअभावी अडकली. त्यांचा तो सगळ्यात कठीण काळ होता. त्यांना वाटले होते की आपले करियर संपले.
advertisement
जावयाची मदत
view commentsअभिनेते युसुफ हुसैन यांना आपल्या जावयाची ही घालमेल पाहवत नाव्हती. त्यांनी जावयाकडे जाऊन सांगितले की, "माझ्याकडे एक फिक्स डिपॉझिट आहे, जे माझ्या काही कामाचे नाही. त्याचा वापर तुम्ही करा." त्यानंतर त्यांनी एक चेक त्यांना दिला. त्या पैशात त्यांनी फिल्मची पूर्ण शूटींग केली. या फिल्मसाठी हंसल मेहता यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 30 ऑक्टोबर 2021 ला युसुफ हुसैन यांचे निधन झाले होते. त्यावर मेहता यांनी सोशल मीडियावर एक मार्मिक पोस्ट लिहून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2025 4:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
हंसल मेहतांचं डूबतं करिअर सासऱ्यांनी वाचवलं, होते प्रसिद्ध अभिनेते, कधी काळी विकायचे कपडे


