Rohit Arya Encounter: रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे API अमोल वाघमारे कोण? गेल्याच महिन्यात रुजू अन्...

Last Updated:
Rohit Arya Encounter: पवईत रोहित याचा एन्काउंटर करून 19 जणांची सुखरुप सुटका केल्यानंतर पोलीस अधिकारी अमोल वाघमारे चर्चेत आले आहेत. एपीआय वाघमारे यांच्याबाबत जाणून घेऊ.
1/5
मुंबईतील पवई परिसरात ऑडीशनला आलेल्या 17 मुलांना रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने ओलीस ठेवलं होतं. आरए स्टुडिओमधील या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले होते. परंतु, तीन तासांच्या संघर्षानंतरही धोका कायम होता. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेने परिस्थिती बदलली आणि 17 मुलांसह 19 जणांचे प्राण वाचले. सहाय्यक उपनिरीक्षक अमोल वाघमारे असं या अधिकाऱ्याचं नाव आहे.

advertisement
2/5
पोलिसांनी रोहित आर्याशी फोनवर संवाद साधून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. शेवटी पोलिसांनी दुसऱ्या बाजूने शिडी आणली आणि बाथरुमच्या खिडकीतून एपीआय यांनी अमोल वाघमारे यांनी आत प्रवेश केला. मात्र, पोलीस अधिकारी वाघमारे यांना पाहताच रोहित आर्या शस्त्र काढण्याच्या तयारीत होता.

3/5
मुलांना धोका पोहचू शकतो याची खात्री झाल्याने एपीआय अमोल वाघमारे यांनी शेवटी गोळीबार केला. यात रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली आणि त्याचा मृत्यू झाला. यानंतर अमोल वाघमारे यांची सर्वत्र चर्चा होतेय. तसेच त्यांच्याबाबत जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.

4/5
रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे एपीआय अमोल वाघमारे हे गेल्या महिन्यातच पवई पोलीस ठाण्यात रुजू झाले होते. क्यूआरटी म्हणजेच तात्काळ मदतीला धावून येणाऱ्या कमांडो टीममधील ते अधिकारी आहेत. वाघमारे यांनी विशेष कमांडो ट्रेनिंग घेतलं असल्यामुळे त्यांना अशा ऑपरेशनमध्ये आत जाण्याची परवानगी देण्यात आली.

5/5
एपीआय वाघमारे हे पवई पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीसी) मध्ये काम करतात. त्यांच्या सहकाऱ्यांत शांत आणि संयमी अधिकारी अशीच त्यांची ओळख आहे. त्यांनी आणीबाणीच्या काळातील परिस्थिती हाताळण्याचं प्रशिक्षण घेतलं आहे. त्यामुळे वाघमारे हे कधीच प्रकाशझोतात येत नाहीत, परंतु कोणतीही परस्थिती संयमानं आणि जबाबदारीनं हाताळण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असल्याचं अधिकारी सांगतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement