Yavatmal Accident : स्कोडा-ट्रकचा भीषण अपघात; कारचा चुराडा, चौघांचा मृत्यू, घटनास्थळावरचे PHOTO

Last Updated:
वणी-चंद्रपूर महामार्गावर लालगुडा गावाजवळ स्कोडा कार अपघातात मायरा शेख, आनिबा, जोया आणि रियाज या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू.
1/7
भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ: काळानं घात केला आणि हसतं खेळतं कुटुंब एका क्षणात उद्ध्वस्त झालं. भरधाव स्कोडाचा अपघात झाला. कारचा चुराडा झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघात इतका भयंकर होता की कारमध्ये काही उरलंच नाही, कारचा पूर्ण चक्काचूर झाला होता.

advertisement
2/7
 यवतमाळ जिल्ह्यातील वणी-चंद्रपूर महामार्गावर लालगुडा गावाजवळ आज सकाळी अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघाताची भीषणता इतकी होती की संपूर्ण कारचा चुराडा झाला आहे. हा अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांची रस्त्यावर मोठी गर्दी जमा झाली होती.

3/7
अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीनं त्यांनी तातडीनं जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवलं. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार स्कोडा डिव्हायडरला धडकल्यानंतर कार भरधाव वेगात समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने हा अपघात घडला.

4/7
या दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला होता, जखमींपैकी एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा चारवर पोहोचला आहे. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा आणि एका प्रौढ महिलेचा समावेश आहे.

5/7
हा अपघात वणीच्या लालगुडा परिसरात घडला. भरधाव वेगात असलेल्या स्कोडा कारने नियंत्रण गमावले आणि ती प्रथम डिव्हायडरला आदळली. डिव्हायडर तोडून कार दुसऱ्या बाजूच्या ट्रॅकवर गेली आणि समोरून येणाऱ्या ट्रकवर जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की स्कोडा कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

6/7
अपघातानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. या दुर्घटनेत सुरुवातीला तीन महिलांचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. याशिवाय, कारमधील इतर दोन ते तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे, जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

7/7
या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी चार जणांची ओळख पटली असून ते सर्व एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. मृतांमध्ये तीन अल्पवयीन मुलींचा आणि एका व्यक्तीचा समावेश आहे. मायरा शेख (वय १७), आनिबा (वय ११), जोया (वय १३) रियाज (वय ५४) यांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा चार झाला आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement