IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नवर कांगारूंकडून रडीचा डाव, तिसऱ्याच बॉलवर बोलवावा लागला डॉक्टर! पहिल्या ओव्हरमध्ये ड्रामा

Last Updated:

India vs Australia 2nd T20 : शुभमन गिल 10 बॉल खेळल्यानंतर तो फक्त 5 धावांवर हेडलवूडच्या बॉलवर मिशेल मार्शच्या हाती कॅचआऊट झाला.

Shubman Gill first over Drama
Shubman Gill first over Drama
Shubman Gill first over Drama : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-ट्वेंटी सामन्यात भारतीय संघाची सुरुवात आतापर्यंत चांगली झालेली नाही. पहिल्याच बॉलवर जोश हेझलवूडने शुभमन गिलविरुद्ध जोरदार एलबीडब्ल्यूची अपील केले. मैदानावरील अंपायरने बोट वर केलं, परंतु रिव्ह्यूने गिलला योग्य ठरवलं. थर्ड अंपारयरने रिप्लेमध्ये बॉल स्टंपवर आदळत नसल्याचे ठरवलं आणि त्याला नॉट आउट घोषित केलं. त्यानंतर कांगारूंनी रडीचा डाव खेळला.

शुभमन गिलच्या हेल्मेटला बॉल लागला

पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर हेझलवूडने धोकादायक बाउन्सर टाकला जो शुभमन गिलच्या हेल्मेटला लागला. त्यामुळे सामना काहीवेळ थांबवावा लागला. मैदानात डॉक्टर आले अन् त्यांनी शुभमन गिलला चेक केलं. त्यानंतर काही वेळाने पुन्हा खेळ सुरू केला. हेझलवूडने पहिल्याच ओव्हरमध्ये कहर केल्याने सामना रंगतदार स्थितीत आला आहे.
advertisement

मिशेल मार्शच्या हाती कॅचआऊट

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शुभमन गिलची फलंदाजी निराशाजनक ठरली आहे. पहिल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत त्याला धावा काढण्यात अडचण आली आणि आता तो दुसऱ्या टी- ट्वेंटी मध्येही परतला आहे, त्याने त्याची विकेटही गमावली. 10 बॉल खेळल्यानंतर तो फक्त 5 धावांवर हेडलवूडच्या बॉलवर मिशेल मार्शच्या हाती कॅचआऊट झाला.
advertisement
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (WK), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
advertisement
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (WK), टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश हेझलवुड.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS 2nd T20 : मेलबर्नवर कांगारूंकडून रडीचा डाव, तिसऱ्याच बॉलवर बोलवावा लागला डॉक्टर! पहिल्या ओव्हरमध्ये ड्रामा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement