IND vs AUS : मेलबर्नमध्ये टीम इंडियाला धक्का, एक-एक रन काढतानाही घाम फुटला, अभिषेक एकटा नडला!

Last Updated:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाची बॅटिंग गडगडली आहे. 18.4 ओव्हरमध्येच भारताचा 125 रनवर ऑलआऊट झाला आहे.

मेलबर्नमध्ये टीम इंडियाला धक्का, एक-एक रन काढतानाही घाम फुटला, अभिषेक एकटा नडला!
मेलबर्नमध्ये टीम इंडियाला धक्का, एक-एक रन काढतानाही घाम फुटला, अभिषेक एकटा नडला!
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये टीम इंडियाची बॅटिंग गडगडली आहे. 18.4 ओव्हरमध्येच भारताचा 125 रनवर ऑलआऊट झाला आहे. अभिषेक शर्मा वगळता कोणत्याही भारतीय खेळाडूला मोठा स्कोअर करता आला नाही. अभिषेक शर्माने 37 बॉलमध्ये 68 रनची खेळी केली, तर हर्षित राणाने 33 बॉल 35 रन केले. भारताचे 3 खेळाडू या सामन्यात शून्य रनवर आऊट झाले. तर राणा आणि अभिषेक वगळता इतर कोणत्याच खेळाडूला दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही. ऑस्ट्रेलियाकडून हेजलवूडला 3 तर बार्टलेट आणि एलिसला 2-2 विकेट मिळाल्या. मार्कस स्टॉयनिसने एक विकेट घेतली, याशिवाय भारताचे दोन खेळाडू रन आऊट झाले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर सुरूवातीपासूनच टीम इंडियाला एकामागोमाग एक धक्के बसायला सुरूवात झाली. शुभमन गिल 5 रनवर, संजू सॅमसन 2 रनवर, सूर्यकुमार यादव 1 रनवर, तिलक वर्मा शून्य आणि अक्षर पटेल 7 रनवर आऊट झाले. 49 रनवरच भारताने 5 विकेट गमावल्या होत्या, यानंतर अभिषेक आणि हर्षित राणा यांच्यात 56 रनची पार्टनरशीप झाली. हर्षित राणा 35 रनवर आऊट झाल्यानंतर पुन्हा भारताची बॅटिंग गडगडली. शिवम दुबे 4 रनवर, कुलदीप यादव शून्य आणि जसप्रीत बुमराहही शून्य रनवर आऊट झाले. या सामन्यात भारतीय टीममध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
advertisement

भारतीय टीम

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, हर्षित राणा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : मेलबर्नमध्ये टीम इंडियाला धक्का, एक-एक रन काढतानाही घाम फुटला, अभिषेक एकटा नडला!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement