'...तर तुला इथं राहू देणार नाही', अजितदादांच्या बारामतीत धक्कादायक प्रकार; उद्योजकासोबत भयानक घडलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
'दारूचे बिल भर नाहीतर हातपाय मोडीन' अशी धमकी उद्योजकाला देण्यात आली होती.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
पुणे : बारामती तालुक्यातील कटफळ येथील अवजारे बनवणाऱ्या उद्योजकाकडून डॉन असल्याचे सांगून वारंवार धमक्या देत ८५ हजार रुपये वसूल केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांत फिर्याद दाखल आहे. फिर्यादी हे बारामती एमआयडीसी मध्ये येथे अवजारे बनवणारी कंपनी चालवतात. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑक्टोबर २०२४ पासून निरज रॉय, शुभम मोरे व भूषण रणसिंगे या तिघांनी स्वतःला 'बारामतीचे डॉन' असल्याचे सांगत त्यांच्याकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात वेळोवेळी पैसे घेतले. हे आरोपी तक्रारदार यांना बारामतीतील विविध हॉटेलमध्ये भेटून दारूचे बिल भरण्यास भाग पाडत होते. एप्रिल २०२५ पासून आरोपींनी 'तुला कंपनी चालवायची असेल तर महिन्याला पैसे द्यावे लागतील, नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही' अशा धमक्या दिल्या. त्यानंतर कधी ४ हजार, कधी १० हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले.ऑक्टोबर २०२५ मध्ये पेन्सिल चौक येथे थांबवून 'दारूचे बिल भर नाहीतर हातपाय मोडीन' अशी धमकी देत फिर्यादीस मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
advertisement
बारामतीत उद्योजकाला लुटलं
याच महिन्यात वंजारवाडीजवळ आरोपींनी त्यांच्याकडून २० हजार रुपये ऑनलाईन मागवले आणि धमकीखाली त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही फिर्यादीने सांगितले आहे. पुढे १८ ऑक्टोबर रोजी रात्री अमरदीप हॉटेल येथेही आरोपींनी पुन्हा भेट देऊन १३ हजार रुपये मागितले व मारहाणीचा प्रयत्न केला.या सर्व कालावधीत आरोपींनी एकूण ८५ हजार रुपयांहून अधिक रक्कम घेतली असून, 'आता पैसे दिले नाहीत तर जिवे मारू' अशी धमकी दिल्याचे अनिकेत मिंड यांनी तक्रारीत म्हटले आहे.
advertisement
आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
बारामती तालुका पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही बाब गांभीर्याने घेत एकाला अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 31, 2025 4:53 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'...तर तुला इथं राहू देणार नाही', अजितदादांच्या बारामतीत धक्कादायक प्रकार; उद्योजकासोबत भयानक घडलं


