मराठ्यांना विवाह प्रस्ताव देणे लक्ष्मण हाके यांना भोवले, बीडमध्ये गुन्हा दाखल
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजासमोर विवाह प्रस्ताव ठेवला. आता ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कोणताही फरक राहिलेला नाही. त्यांनी आमच्यातल्या पोरांना (ओबीसी) मुली दिल्या पाहिजेत, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले.
सुरेश जाधव, प्रतिनिधी, बीड : मराठा समाज आता आमच्यात (ओबीसी प्रवर्गात) आलाच आहे, यायचा प्रयत्न करता आहात तर आता आमच्यातल्या सर्वगुणसंपन्न पोरांशी तुमच्या पोरींची लग्नही लावा, असे म्हणत मनोज जरांगे यांच्यासमोर विवाह प्रस्ताव ठेवला. हाच विवाह प्रस्ताव देणे लक्ष्मण हाके यांना भोवले असून त्यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण हवे अर्थात कुणबी दाखले हवे, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. याच अनुषंगाने बोलताना गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी फाटा येथे झालेल्या सभेमध्ये लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजासमोर विवाह प्रस्ताव ठेवला. आता ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कोणताही फरक राहिलेला नाही. त्यांनी आमच्यातल्या पोरांना (ओबीसी) मुली दिल्या पाहिजेत, अशा आशयाचे वक्तव्य केले.
advertisement
लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले असा आरोप करून गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरक्षण प्रश्नावर बोलताना लक्ष्मण हाके यांनी महिलांचा अपमान केला, असे सांगत शिंदे यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गल्लीतील टपोरी पोरांसारखी त्यांची भाषा,तुम्हाला नीट करायला आम्हाला फारसा वेळ लागणार नाही-विनोद पाटील
advertisement
हाके अनेक दिवसांपासून असंबंध बडबड करीत आहेत. काल-परवा त्यांनी मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीचे दाखले देत फार वैचारिक (?) असल्याचं भासवतात. प्रत्यक्षात गल्लीतील टपोरी पोरांसारखी त्यांची भाषा आहे. मोठमोठ्यानं बोलत अत्यंत पोरकट भाषणं ते करत असतात. वाद विकोपाला कसा जाईल, यावर त्यांचा भर असतो. हाके जिभेला आवर घालावा, तुम्हाला नीट करायला आम्हाला फारसा वेळ लागणार नाही. अधिकचं बोलणं नको. तेवढी त्यांची लायकी नाही, असे ट्विट करून मराठा समाजाचे नेते विनोद पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Sep 14, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठ्यांना विवाह प्रस्ताव देणे लक्ष्मण हाके यांना भोवले, बीडमध्ये गुन्हा दाखल










