Maharashtra Politics: 'आपण पुन्हा एकत्रित आलं पाहिजे...' चंद्रकात दादा आणि राऊतांमध्ये नेमकी काय चर्चा?
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
संजय राऊत म्हणतात, " अरे व्वा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे" दोघांनी असं म्हटलं. मात्र, हा संवाद राजकीय नव्हता, चहा पिण्यासाठी एकत्र येऊया, असं म्हणायचं होतं, असं संजय राऊत म्हणाले. माझी लाईन कधीही चुकत नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले.
मुंबई: विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान जवळपास पूर्ण झालं आहे. एकूण 274 सदस्यांनी यावेळी मतदान केलं आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. भाजपने सर्वाधिक पाच उमेदवारांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. तर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीतील ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे. काँग्रेसने देखील एक उमेदवार रिंगणात उतरवला आहे.
चंद्रकात पाटील आणि संजय राऊतांमधील चर्चेचा व्हिडिओ समोर: विधानभवनात आमदारांकडून मतदान सुरु असताना संजय राऊत आणि अजित पवार यांनी हस्तांदोलन केलं. यानंतर राज्यसभा खासदार संजय राऊत आणि भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील हे आमनेसामने आले. दोघांचा या वेळी चर्चा करतना एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावेळी संजय राऊत म्हणतात, " अरे व्वा, आपण तर परत एकत्र यायला पाहिजे" दोघांनी असं म्हटलं. मात्र, हा संवाद राजकीय नव्हता, चहा पिण्यासाठी एकत्र येऊया, असं म्हणायचं होतं, असं संजय राऊत म्हणाले. माझी लाईन कधीही चुकत नाही, असं देखील संजय राऊत म्हणाले.
advertisement
व्हिडिओ व्हायरल आणि राजकीय चर्चा: जून महिन्यात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांचा पेढे भरवतानाचा व्हिडिओ अगदी असाच समोर आला होता. त्यावेळी देखील भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकमेकांना टाळी देणार, अश्या वावड्या उठल्या होत्या. त्याच धर्तीवर चंद्रकांत पाटील आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचं हे संभाषण आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2024 4:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Politics: 'आपण पुन्हा एकत्रित आलं पाहिजे...' चंद्रकात दादा आणि राऊतांमध्ये नेमकी काय चर्चा?


