advertisement

दोन भावांच्या भांडणात धाराशिवचे नुकसान, एक रील बनवतो, दुसरा.... सरनाईकांचा हल्लाबोल

Last Updated:

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

ओमराजे निंबाळकर-राणा जगजीतसिंह निंबाळकर-प्रतारप सरनाईक
ओमराजे निंबाळकर-राणा जगजीतसिंह निंबाळकर-प्रतारप सरनाईक
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : दोन भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचे नुकसान झाले आहे, असे वक्तव्य धाराशिवचे पालकमंत्री तथा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे. उमरगा येथे शिवसेना उमेदवार किरण गायकवाड यांच्या प्रचारसभेत सरनाईक बोलत होते.
नगरपालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. निवडणुकीला अगदी काही तास शिल्लक राहिलेले असताना उमरग्यात सरनाईक यांनी सभा घेत प्रस्थापित निंबाळकर आणि पाटील घराण्यावर सडकून टीका केली.
महायुती सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. निधीतून जिल्ह्याचा विकास साधायचा ऐवजी एक पाण्यात उतरून रील बनवतो, तर दुसरा समाजमाध्यमांवर स्वतः स्वतःची पाठ थोपटून घेतो, अशी टीका प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर केली.
advertisement

जिल्ह्यात नगरपालिकांसाठी स्थिती काय?

जिल्ह्यात नगरपालिकांसाठी ८ पैकी ५ ठिकाणी‎ भाजपने नगराध्यक्षपदासाठी स्वतंत्र‎ उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे महायुतीतील संघर्ष उफाळून आला आहे. दोन ‎ठिकाणी काँग्रेसला सोबत घेऊन,‎ तर एका ठिकाणी शिंदे सेनेला‎सोबत घेऊन भाजप लढत आहे.

भावांमध्येच आरोप प्रत्यारोप

मी तीर गावचा असून बारा गावचा पाटील आहे. त्यामुळे माझ्याकडे गाड्या असणारच. विरोधकाकडे बोलायला आणि प्रचार करायला मुद्दे नसतात. त्यामुळे ते माझ्या गाड्यांकडे येतात. पण त्यांना माहिती नाही की काय मी तीर गावचा आणि बारा गावचा पाटील आहे. ते कोण आहेत? मी त्यांच्याविषयी बोलणार नाही, अशी टीका भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर प्रचार सभेत बोलताना केली.
advertisement
खासदार उमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांकडून राणा जगजीत सिंह पाटील व त्यांचे कुटुंबीय वापरत असलेल्या गाड्यांचे व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल केले जात होते. त्यावर राणा जगजीत सिंह पाटील यांनी अप्रत्यक्षपणे खासदार ओमराजे निंबाळकर यांना जोरदार टोला लागला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन भावांच्या भांडणात धाराशिवचे नुकसान, एक रील बनवतो, दुसरा.... सरनाईकांचा हल्लाबोल
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement