कोयता गँगचा नंगानाच सुरूच, पुण्यात बाजीराव रस्त्यावर तिघांवर हल्ला, एक जण रक्ताच्या थारोळ्यात
- Published by:Akshay Adhav
 
Last Updated:
पुण्यातल्या कोंढवा भागातील खडी मशिन चौकातील गणेश काळे याच्या हत्येची बातमी ताजी असतानाच बाजीराव रस्त्यावर भर दुपारी गुन्हेगारांनी मयंक खराडे याच्यावर कोयत्याने वार केले.
अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्यातले टोळीयुद्ध शमल्याची फुशारकी पुणे पोलीस मारत असताना त्यांच्या नाकावर टिच्चून गुन्हेगारांनी अतिशय गजबलेल्या बाजीराव चौकात दिवसा ढवळ्या एका तरुणाची हत्या केली. दुचाकीवर जाणाऱ्या तीन तरुणांवर आरोपींनी कोयत्याने हल्ला केला. मयंक खराडे असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पुण्यातल्या कोंढवा भागातील खडी मशिन चौकातील गणेश काळे याच्या हत्येची बातमी ताजी असतानाच बाजीराव रस्त्यावर भर दुपारी गुन्हेगारांनी मयंक खराडे याची हत्या केली. पुण्यात गेली अनेक महिने कोयता गँगची दहशत आहे. पोलीस प्रशासन आणि सरकार अशा गुन्हेगारी कारवायांना अटकाव घालण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे. परंतु त्यांना यश येत नसल्याचे चित्र आहे. बाजीराव चौकात हत्या झाल्याचे कळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
advertisement
नेमकी घटना काय, कशी घडली?
पुण्यात बाजीराव रस्त्यावरून तीन जण दुचाकीवरून जात होते. मागून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तरुणांवर कोयत्याने वार केले. त्यांच्या हल्ल्यात मयंक खराडे अतिशय गंभीर जखमी झाला. मयंक रक्ताच्या थारोळ्यात पडला. दुचाकीवरील दुसरा तरुणही जखमी झाला आहे. मयंक खराडे याची परिस्थिती चिंताजनक आहे. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या दुसऱ्या तरुणाचे नाव अभिजीत इंगळे असे आहे.
advertisement
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची टीम
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. तसेच फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांकडून विविध टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 04, 2025 4:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कोयता गँगचा नंगानाच सुरूच, पुण्यात बाजीराव रस्त्यावर तिघांवर हल्ला, एक जण रक्ताच्या थारोळ्यात


