अजित पवारांच्या जवळच्या नेत्यानेच पार्थ पवारांना अडकवलं? शिंदेंच्या आमदाराने थेट नावच घेतलं
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यानेच पार्थ पवारांना या प्रकरणात अडकवल्याची माहिती समोर आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार हे पुण्यातील एका जमीन घोटाळा प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. पुण्याच्या कोंढवा परिसरातील सरकारी जमीन खरेदी केल्याच्या कारणातून पुण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. आता पार्थ पवारांच्या कंपनीकडून या जमीनीचा व्यवहार रद्द केला आहे. मात्र अद्याप त्यांची या प्रकरणातून पूर्णपणे सुटका झाली नाही. त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
अशात आता पुण्यातील जमीन घोटाळ्याप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीय नेत्यानेच पार्थ पवारांना या प्रकरणात अडकवल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने एका कार्यक्रमात जाहीरपणे याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यांनी पार्थ पवारांना अडकवणाऱ्या नेत्याचं देखील नाव घेतलं आहे. हा आरोप शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.
advertisement
पार्थ पवारांना अडकवणारा अजित पवार गटाचा नेता कोण?
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. अजित पवार याचे पूत्र पार्थ पवार यांना जमीन खरेदी घोटाळा प्रकरणात गुंतवण्यात खासदार सुनील तटकरे यांचा हात असल्याचा आरोप महेंद्र दळवी यांनी केला आहे. सुनिल तटकरे हे अजित पवार यांच्या मुलाला बदनाम करत आहेत. सुनील तटकरे यांची वाटचाल भाजपच्या दिशेने सुरू असल्याचा विधान देखील आमदार दळवी यांनी केलंय.
advertisement
महेंद्र दळवी यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवारांच्या पुत्राला अडकवण्यात त्यांच्याच जवळच्या नेत्याचा हात आहे का? यावरून आता विविध तर्क वितर्क लढवले जात आहेत. आता या सगळ्यावर अजित पवारांकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
November 21, 2025 10:16 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अजित पवारांच्या जवळच्या नेत्यानेच पार्थ पवारांना अडकवलं? शिंदेंच्या आमदाराने थेट नावच घेतलं


