Tejashri Pradhan : 'प्रेक्षकहो...', मालिकेबाबत तेजश्री प्रधानची मोठी अपडेट, ती काय?

Last Updated:
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या मालिकेविषयी महत्त्वाची अपडेट दिली आहे. तेजश्रीबरोबरच चॅनेलने देखील पोस्ट शेअर केली आहे.
1/9
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेत नुकताच भव्य विवाह सोहळा पार पडला. प्रेक्षकांनी या एपिसोडला चांगला प्रतिसाद दिला.

advertisement
2/9
दरम्यान, काही दिवसांआधी अभिनेत्री तेजश्री प्रधान 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तेजश्रीची मालिकेतून एक्झिट होणार हे ऐकल्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.

3/9
दरम्यान, तेजश्री प्रधानने या अफवा असल्याचं सांगितलं होतं. झी मराठी आणि मालिकेशी असलेली नाळ तुटणार नाही असं ती म्हणाली होती, मालिका सोडण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचंही तिने सांगितलं होतं.

4/9
तेजश्री मालिका सोडणार नाही हे तिच्याच तोंडून ऐकल्यानंतर तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. दरम्यान, आता तेजश्री प्रधानने तिच्या मालिकेविषयी एक मोठी अपडेट दिली आहे. तिच्या सोशल मीडियावर तिने खास पोस्ट देखील शेअर केली आहे.

5/9
'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेत 8 - 11 नोव्हेंबर या काळात भव्य विवाहसोहळा दाखवण्यात आला होता. समर-स्वानंदी आणि अधिरा-रोहन यांचं लग्न झालं. लग्नानंतर मालिकेत आता खरी गंमत सुरू झाली आहे.

6/9
मालिकेत सध्या सत्यनारायण पूजा, पहिला स्वंयपाक आणि काकूची कटकारस्थान दाखवण्यात येत आहेत. अशातच झी मराठी वाहिनी आणि तेजश्रीने एक मोठी अपडेट दिली आहे.

7/9
गुरुवार आला की सगळ्यांचं लक्ष हे टीआरपीकडे लागून असतं. समर आणि स्वानंदीची जोडी प्रेक्षकांना आवडली असून तेजश्री प्रधानचं झी मराठीवरील कमबॅक हिट ठरलं आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका या आठवड्यात 4 TVR रेटिंगसह अव्वल ठरली आहे. 7.30 ते 8 या वेळेत या मालिकेला 4 TVR रेटिंग मिळालं आहे.

8/9
या यशानंतर झी मराठी वाहिनीने पोस्ट शेअर करत लिहिलंय,
या यशानंतर झी मराठी वाहिनीने पोस्ट शेअर करत लिहिलंय, "प्रेक्षकहो घट्ट होतेय आपल्या प्रेमाची वीण, तुमच्या आमच्या प्रेमाची वीण अशीच घट्ट होत जाऊ देत. मायबाप प्रेक्षकांचे आभार."
advertisement
9/9
तर तेजश्री प्रधानने देखील पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. सुबोध भावेसोबतच्या सेटवरचा फोटो शेअर करत तिने लिहिलंय,
तर तेजश्री प्रधानने देखील पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. सुबोध भावेसोबतच्या सेटवरचा फोटो शेअर करत तिने लिहिलंय, "काय बरं सेलिब्रेट करतोय आम्ही गुरुवारी. P.S We Love You Audience" असं म्हणत तेजश्रीने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement