Pune: काँग्रेसला मोठा धक्का, भाजपने आणखी एक नेता फोडला, निवडणुकीपूर्वी मोठा डाव

Last Updated:

Sanjay Jagtap: काँग्रेस नेते संजय जगताप यांनी सासवड येथे पत्रकार परिषद घेऊन पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली.

संजय जगताप (काँग्रेस नेते)
संजय जगताप (काँग्रेस नेते)
पुणे : विधानसभा निवडणुकीचा एकतर्फी निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी रीघ लावली आहे. विधानसभेतील मविआच्या ७६ उमेदवारांनी आतापर्यंत सत्ताधारी पक्षात प्रवेश केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी विरोधकांना हादरे देऊन प्रतिस्पर्ध्यांचा पक्ष खिळखिळा करण्याचे भाजपने धोरण दिसते.
पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेसला राम राम ठोकला असून येणाऱ्या बुधवारी ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सासवड येथे पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस नेते संजय जगताप यांनी पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली. संग्राम थोपटे यांच्यानंतर संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. संजय जगताप यांच्या प्रचारावेळीच 'तू कसा आमदार होतो तेच पाहतो', असे अजित पवार हे विजय शिवतारे यांना उद्देशून म्हटले होते.
advertisement
आजपर्यंत आम्ही सत्तेसाठी कधीही राजकारण करत नाही किंवा तसे कधी कामही केले नाही. माझे वडील म्हणायचे बर झालं मी आमदार झालो नाही. एक मुलगा अधिकारी झाला आणि आपल्या संस्था चांगल्या झाल्या. आघाड्यांचे राजकारण आता बस्स झाले. ही सोयरिक कुठल्याही हुंड्यासाठी नाही. जिकडे आपण जातोय तिकडे आपला प्रत्येक विषयाला उचलून धरला जाईल, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.
advertisement
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत १६ तारखेला होईल. प्रवेशानंतर आपण जोमाने काम करू. आपले विषय आपण लावून धरू. सकारात्मक राजकारण करण्याचा प्रयत्न करू, असे संजय जगताप म्हणाले.

संजय जगताप कोण आहेत?

संजय जगताप हे पुरंदरचे काँग्रेसचे नेते आहे
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला
२०१९ ते २०२४ दरम्यान त्यांनी पुरंदर विधानसभेचे नेतृत्व केले
advertisement
शिवतारे यांचे कट्टक विरोधक अशी त्यांची ओळख आहे
जगताप यांनी तालुक्यात काँग्रेस पक्षाची चांगली बांधणी केली होती
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pune: काँग्रेसला मोठा धक्का, भाजपने आणखी एक नेता फोडला, निवडणुकीपूर्वी मोठा डाव
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement