Leopard Attack : लाईट गेली अन् घात झाला, आईच्या डोळ्यादेखतच काळजाच्या तुकड्याला बिबट्याने...चिमुरडीसोबत काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
घराच्या अंगणात आई एका मुलाला जेवण भरवत असताना विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचवेळी घराशेजारी एक बिबट्या शिकारीच्या हेतुने दबा धरुन बसला होता.
Leopard Attack Little Girl : सचिन तोडकर, पुणे/ मंचर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आईच्या डोळ्यादेखतच काळजाच्या तुकड्याला बिबट्याने उचलून नेल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळेस लाईट नसल्याने बिबट्याने चिमुरडीवर हल्ला करत तिला शेतात फरफटून नेले. त्यानंतर तिच्यावर हल्ला करत जीव घेतला आहे. रक्षा निकम (वय 4) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. या घटनेने निकम कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
शिरुर तालुक्यातील पिंपळसुटी येथे ही घटना घडली आहे. आईच्या समोरच 4 वर्षीय चिमुकल्या लेकीवर बिबट्याने हल्ला करत ठार केल्याची घटना आहे. घराच्या अंगणात आई एका मुलाला जेवण भरवत असताना विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचवेळी घराशेजारी एक बिबट्या शिकारीच्या हेतुने दबा धरुन बसला होता. यावेळी बिबट्याने दुसऱ्या मुलीवर अचानक झडप टाकत शिकार केली.
advertisement
विशेष म्हणजे आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याच्या या हल्ल्याचा थरार घडला होता. यावेळी आईने मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. बिबट्याने चिमुकल्या मुलीला शिकारीच्या हेतुने शेतात फरफटत घेऊन जाऊन ठार केले.
यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मुलीचा शोध घेतला असता दोन तासांनी आर्धा किलोमीटर अंतरावर मुलीचा मृतदेहाचे धड एकीकडे तर शीर दुसरीकडे मिळुन आले. त्यामुळे चिमुरडीच्या मृत्यूनंतर निकम कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
advertisement
बिबट्याच्या हल्ल्यात रक्षा निकम ही ४ वर्षीय मुलगी ठार झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. शिरुर तालुक्यात मागच्या दोन महिन्यातली बिबट्याच्या हल्ल्याची लहान मुले ठार होण्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे आता बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरतेय.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 25, 2024 9:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Leopard Attack : लाईट गेली अन् घात झाला, आईच्या डोळ्यादेखतच काळजाच्या तुकड्याला बिबट्याने...चिमुरडीसोबत काय घडलं?


