काम करायचं असेल तर...ठाकरेंच्या आमदाराला विखेंची भर सभेत पक्षप्रवेशाची खुली ऑफर

Last Updated:

Radakrishna Vikhe Patil: राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी हे लोहारा तालुक्यातील करजखेडा येथे जलसंपदा विभागाने केलेल्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी एकत्र आले होते.

उद्धव ठाकरे आणि राधाकृष्ण विखे पाटील
उद्धव ठाकरे आणि राधाकृष्ण विखे पाटील
बालाजी निरफळ, प्रतिनिधी, धाराशिव : ठाकरे गटाचे उमरगा लोहाराचे आमदार प्रवीण स्वामी यांना जलसंपदा मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. ठाकरेंची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात प्रचंड कटुता असताना सोमवारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकत्र आले होते.
राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी हे लोहारा तालुक्यातील करजखेडा येथे जलसंपदा विभागाने केलेल्या कामाच्या उद्घाटनाप्रसंगी एकत्र आले असता आमदार प्रवीण स्वामी यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे मतदारसंघातील एका कामाची मागणी केली. त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याला उत्तर देताना आमदार साहेब तुम्ही माझ्याकडे कामाची मागणी केली पण तुम्हालाही हे आता कळलं पाहिजे की पाणी कुठल्या वळणावर आहे, त्यामुळे तुम्ही आवश्यक निर्णय घ्या, पाणी तर आम्हीच आणि आमचे एनडीए सरकारच देणार असे म्हणत पक्षप्रवेशाची खुली ऑफरच दिली.
advertisement

ठाकरे गटाच्या आमदाराला राधाकृष्ण विखेंची भर सभेत पक्षप्रवेशाची खुली ऑफर

जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी उपस्थित लोकांना देखील हात उंचावायला सांगत प्रवीण स्वामी यांना निर्णय घ्यायला भाग पाडा, असे सूचित केले. देशात आणि राज्यात काँग्रेस, उद्धव ठाकरे गट हे सरकारच्या विरोधात आंदोलन करत असताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र ठाकरे गटाच्या आमदाराने कामाची मागणी केल्यावर थेट महायुतीत येण्याची ऑफर दिल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
advertisement
गेल्या काही दिवसात प्रवीण स्वामी हे देखील महायुतीमधील नेत्यांच्या संपर्कात वारंवार येत असल्याने त्यांच्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असतानाच आता खुद्द मंत्री विखे पाटील यांनी खुली ऑफर दिल्यामुळे धाराशिव जिल्ह्यात ठाकरेंना धक्का बसतो की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
काम करायचं असेल तर...ठाकरेंच्या आमदाराला विखेंची भर सभेत पक्षप्रवेशाची खुली ऑफर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement