अशोकरावांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा; सभेनंतर एसटी स्थानक गाठलं, गप्पा मारत घेतला ऊसाच्या रसाचा घोट
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सभा संपल्यानंतर राहुल गांधी थेट नांदेडच्या बस स्थानकात पोहोचले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती.
नांदेड : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आजपर्यंत कुठेही प्रवास किंवा प्रचारासाठी गेले की त्यांची सर्वसामान्य लोकांबरोबर नाळ जोडून घेण्याचा (Maharashtra Assembly Election) प्रयत्न असो किंवा कार्यकर्त्यांसोबत बसून वेळ घालवण्याची सवय असो यामुळे राहुल गांधी नेहमी चर्चेत असतात. असाच अनुभव आज नांदेडमध्येही पहायला मिळाला. नांदेडमध्ये संभा आणि त्यानंतर दिल्ली असा राहुल गांधीचा नियोजित दौरा होता. मात्र सभा संपल्यानंतर राहुल गांधी यांनी कुठल्याही हॉटेलमध्ये न जाता ताफा थेट नांदेडच्या बस डेपोमध्ये घेऊन गेले. एवढच नाही तर तिथे त्यांनी ऊसाच्या रसाचा देखील आस्वाद घेतला.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेड जिल्हा ओळखला जातो. सभा संपल्यानंतर राहुल गांधी थेट नांदेडच्या बस स्थानकात पोहोचले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती . त्या गर्दीतून वाट काढते बस स्थानकातील एका रसवंतीगृहात गेले . रसवंतीमध्ये असलेल्या महिलांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .त्यांना महालक्ष्मी योजना आणि काँग्रेस आघाडीच्या योजनांची माहिती दिली . राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली .
advertisement
राहुल गांधी महिलांना काय म्हणाले?
राहुल गांधींनी यावेळी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी महागाई आणि बेरोजगारीविषयी राहुल गांधींना सांगितले. तसेच राहुल गांधींनी यावेळी महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेविषयी देखील सांगितले. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 3000 रुपये येणार, महिलांना राज्यात मोफत प्रवास करता येणार आहे असे देखील राहुल गांधींनी सांगितले.
राहुल गांधींना पाहण्यासाठी महिलांची गर्दी
advertisement
रसवंतीगृहात राहुल गांधी अचानक गेल्याने यंत्रणांची मोठी धावपळ झाली. नांदेडच्या बसस्थानक गप्पा मारल्यानंतर राहुल गांधींनी बस स्थानकातील नवनाथ रसवंतीगृहाला भेट दिली. राहुल गांधी अचानक आल्याचे पाहून रसवंतीगृहातील लोकांना देखील काही काळ विश्वास बसत न्हवता. राहुल गांधी यांनी नांदेड बस स्थानकात जवळपास अर्धा तास तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान राहुल गांधींनी देखील थेट रसवंतीगृह गाठत ऊसाच्या रसाचा आस्वाद घेतला. यावेळी राहुल गांधी आल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
November 14, 2024 7:45 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अशोकरावांच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींची सभा; सभेनंतर एसटी स्थानक गाठलं, गप्पा मारत घेतला ऊसाच्या रसाचा घोट