दोन सख्खा भावांकडून आईवडिलांची हत्या, घरात घुसून घोटला गळा, दुहेरी हत्याकांडाने रायगड हादरलं!

Last Updated:

रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथं दोन भावांनी आपल्या वयोवृद्ध आईवडिलांची निर्घृण हत्या केली आहे.

News18
News18
रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथं दोन भावांनी आपल्या वयोवृद्ध आईवडिलांची निर्घृण हत्या केली आहे. संपत्तीवरून झालेल्या वादानंतर आरोपींनी संगनमत करून जन्मदात्यांना संपवलं आहे. दुहेरी हत्याकांडाची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
ही घटना रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंडदी गावात घडली. दोन सख्ख्या मुलांनीच मालमत्तेच्या वादातून आई वडिलांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. शनिवारी घरामध्ये वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असता मुलांनीच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
मृत महादेव बाळ्या कांबळे (९५) व त्यांच्या पत्नी विठाबाई महादेव कांबळे (८३) असं मयत दाम्पत्याचं नाव आहे. ते मेंदडी गावातील रहिवासी होते. त्यांची दोन मुले नरेश महादेव कांबळे (६३) चंद्रकांत महादेव कांबळे (६०) ही वृद्ध आईवडिलांना घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने, आईवडिलांनी त्यांना घरात येण्यास बंदी घातली होती. त्याचवेळी मालमत्ता आईवडिलांच्या नावे होती. त्यामुळे वाटणीवरून आईवडिलांचे व मुलांचे वाद झाले होते.
advertisement
याच वादातून नरेश आणि चंद्रकांत या दोन मुलांनी आईवडिलांची गळा दाबून हत्या केली आणि घरातून पोबारा केला. शनिवारी सायंकाळी घरातून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर शेजाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह ताब्यात घेत तपास केला. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, डॉग स्क्वाड व फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण केले. तपासात मुलांनीच हत्या केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांना अटक केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
दोन सख्खा भावांकडून आईवडिलांची हत्या, घरात घुसून घोटला गळा, दुहेरी हत्याकांडाने रायगड हादरलं!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement