Raigad News : रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट, तटकरेंना शह देण्यासाठी भरत गोगावलेंचा नवा डाव...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Bharat Gogawale Sunil Tatkare : आता रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. तटकरे यांना आव्हान देणारे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी आता रायगडमध्ये मोठी खेळली आहे.
दिनेश पिसाट, प्रतिनिधी, रायगड : रायगडच्या राजकारणात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत असतात. जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून हा वाद आणखीच चिघळला आहे. शिवसेना शिंदे गट भरत गोगावले यांच्यासाठी आग्रही आहे. तर, राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुती सरकारकडून अदिती तटकरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, शिंदे गटाच्या विरोधानंतर तटकरे यांचे नाव मागे घेण्यात आले.
आता रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. तटकरे यांना आव्हान देणारे शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी आता रायगडमध्ये मोठी खेळली आहे. रायगड मधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे श्रीवर्धन मतदार संघाचे उमेदवार राहिलेले अनिल नवगणे हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे. नवगणे यांनी अदिती तटकरेंविरोधात निवडणूक लढवली होती.
advertisement
भरत गोगावलेंची घोषणा...
आज म्हसळा येथे रविप्रभा संस्थे मार्फत गुणगौरव सोहळा आयोजित करण्याचा आला होता. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि अनिल नवगणे हे निवडणुकांनंतर प्रथमच एका व्यासपीठावर आले होते. अनिल नवगणे हे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होते. मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिस्तभंगाची कारवाई केली. त्यामुळे अनिल नवगणे यांची पक्षातून हकलपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर श्रीवर्धन मतदार संघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुक लढवली होती. नवगणे यांच्या प्रचारासाठी स्वतः शरद पवारांनी म्हसळा येथे जाहिर सभा घेतली होती. मात्र, त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला.
advertisement
भरतशेठचा डाव यशस्वी होणार?
अनिल नवगणे यांचा श्रीवर्धन मतदार संघात दांडगा अनुभव आहे. आगामी काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागू शकतात. या पार्श्भूमीवर नवगणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश हा राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दुसरीकडे भरत गोगावले हे नवगणेचा पक्षप्रवेश घेत सुनील तटकरे यांना शह देण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
view commentsLocation :
Raigad,Maharashtra
First Published :
April 13, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Raigad News : रायगडच्या राजकारणात पुन्हा एकदा ट्विस्ट, तटकरेंना शह देण्यासाठी भरत गोगावलेंचा नवा डाव...


